श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणीत) या नावाने कार्यरत असणारी सेवा केंद्रे जनहित, राष्ट्रहित, देशहित व विज्ञानाला सामोरे जावून विविध कार्य करीत आहेत. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा भक्ती, ज्ञान, वैराग्य नाम, जप, तप, यज्ञ सेवा यांच्या अनुषंगाने कार्य करीत आहे. मानवास मानवधर्म व मानवी समस्या या बाबींवर मार्गदर्शन करून समस्या सोडवित आहे.
आर्त-पीडीत, दुःखितांना प्रसंगी हिंमत, धैर्य, विश्वास, सकारात्मता देऊन त्यांच्या मुखावर स्मितहास्य निर्माण करण्याचे काम परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेल्या १८ विभागातून अविरतपणे सुरु आहे. या कार्यातून ८० % समाजिक कार्य, २० % अध्यात्म १८ विभागातून सातत्यपुर्वक केले जाते