Travel Vishwa

भटकंती तसा मानवाचा मुळ स्वभाव माणूस फिरल्या शिवाय राहूच शकत नाही पण फिरणं आणि मनापासून केलेली भटकंती यात फरक असतोच

विविधतेत नटलेला आणि असंख्य वर्षांच्या पाऊलखुणा जपणारी ही आपली मायभूमी जी पावलो पावली संस्कृती बदलते मग ती राहणीमान असो बांधकाम शैली असो किंवा खाद्यसंस्कृती मैलो मैली भरभरून पहायला मिळते

डोंगर दऱ्या तलाव नद्या झऱ्यां पासून समुद्रापर्यंत आणि वाड्यांपासून राजसदरापर्यंत कधी मळकट धोतरामध्ये तर कधी भरजरी पैठणी पर्यंत कधी खमंग अशा भजी मध्ये तर कधी पुरणपोळी पर्यंत गरमागरम चहा तर समुद्रावरील सोलकढी होवून ही संस्कृती निरनिराळ्या रूपात नांदत असते

तर अशा निरनिराळ्या खुणा पाहुयात एका वेगळ्या चौकटीतून रांगड्या डोंगर दऱ्यांपासून समुद्राची शितलता आणि काळ्या माती पासून रेतीची मृदूता अनुभवायला चला फिरुया " #Travel_विश्व " सोबत