नमस्कार शेतकरीबांधवांनो मी आपला कृषी मित्र अश्विन सुभाषराव राठोड आपल्या सर्वांना किसान कट्टा (Kisan Katta) या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती बद्दलची नवनवीन माहिती, आधुनिक शेती संदर्भातील नवीन तंत्रज्ञान, आपल्या पर्यंत घेऊन येत आहे. आपल्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत शेतीबद्दलची योग्य माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहे. कारण माझे वडील देखिल शेतकरीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्तिथी खूप जवळून पाहली आहे, मला माझा शेतकरी राजा आधुनिक शेतीकडे न्यायचा आहे, वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या जीवन कथा त्यांचं यश आणि त्यांनी केलेली प्रगती हे मला सर्व शेतकरी वर्गाला या चॅनेल च्या माध्यमातून दाखवायचे आहे. माझं शिक्षण हे Bsc. Agriculture आणि MBA In Agriculture असे झालेले आहे आणि त्यामुळेच या शिक्षणाच्या कालावधीत मी जे काही ज्ञान मिळवलं ते मला माझ्या शेतकरी बांधवपर्यंत पोहोचवायचे आहे. जय जवान, जय किसान