4.2 k subscribers 10 video
शेतीविषयी_बोलू_काही...
नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी नागपूर- काटोल भागात ‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानाचा आधार शेतकरी घेऊ लागले आहेत. त्यातून विविध शिफारशींसह सधन लागवडीचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. बरेच शेतकऱ्यांनी याच माध्यमातून उत्पादकता वाढवण्यास सुरवात केली आहे. जागतिक स्तरावर तसेच देशाच्या अन्य भागात असलेल्या संत्रा वाणांच्या तुलनेत नागपुरी संत्र्याची उत्पादकता कमी आहे. सातपुडा पर्वत रांगा तसेच नागपूर व अमरावती जिल्ह्यातील भौगोलिक वातावरण या वाणाला अधिक पोषक आहे. आता या भागातील शेतकऱ्यांसाठी ‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सधन लागवडीचा पर्याय उपलब्ध होत आहे.
याच तंत्रज्ञानाचा उपयोग करुन माझ्या शेतात लागवड करायची ठरवली आहे...
त्याची तयारी सुरू आहे...
अगदी मशागतीपासून, बारीक सारीक गोष्टी मी त्यात दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे..
त्यामूळे शेतकऱ्यांना त्यातून मार्गदर्शन मिळणार