नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो!!!
दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैश्याची गरज हि प्रत्येकालाच असते म्हणून प्रत्येक व्यक्ती मेहनत करून पैसे कमविते. कमविलेल्या पैशातून बचत करते.
पैसे वाचवणे म्हणजेच बचत करणे. परंतु बचत केलेले पैसे गुंतवून पैश्याची वृद्धी करणे हे खूप जास्त महत्वाचे असते.
आज मराठी माणसाला पैसे कुठे गुंतवावे हे कळत नाही कारण त्याच्या पर्यंत योग्य माहितीच पोहोचत नाही.
मराठी माणूस हा अर्थ साक्षरतेपासून फार दूर राहिला आहे. मराठी माणूस कितीही मोठा सुशिक्षित असेल. मोठा व्यापारी असेल. परंतु तो अर्थ – साक्षर नाही.
फारच कमी लोक अर्थ – साक्षर आहेत. अर्थ साक्षरता हि काळाची गरज आहे. कारण कुठल्याही शाळेत अथवा महाविद्यालयात असे शिक्षण दिले जात नाही.
एखादी व्यक्ती जोपर्यंत शरीराची साथ आहे तोपर्यंतच काम करू शकते परंतु त्यानंतर काय ?
अशावेळी जर तुम्ही तुमच्या पैशाला कामाला लावले असेल तर तुमचा पैसा तुम्हाला आयुष्यभर प्रचंड पैसा कमवून देईल.
"मराठी माणसांचे, मराठी माणसांसाठी"!
- श्री. अमित बागवे
http://arthsanket.in/