नमस्कार मित्रांनो, आठवणी मनातल्या या youtube चॅनल ला भेट दिल्याबद्दल आपलं मनापासून आभार. मित्रांनो या चॅनल च्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांच्या आठवणीतील शाळा शाळेतील गमती जमती जुने दिवस याचबरोबर बालपणीच्या आठवणी ज्या आपल्याला आपल्या भूतकाळात घेऊन जाऊन जुने दिवस जगायची एक काल्पनिक ताकद देतात त्या आठवणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हा आपल्या सर्वांसाठी एक आल्हाद दायक अनुभव असेल. या धकाधकीच्या जगात आपण पैसे संसार नाती यामधे अडकून गेलो आहोत. या व्यस्त जीवनात मनाला प्रसन्न करणारी आणि जगायला नवी उमेद देणारी कोणतीच समाधानकारक गोष्ट आपल्याकडे नाही. हे दिवस विसरून जुन्या आठवणी जगाव्या त्याचा एक भाग व्हावं. कलपनेच्या जगात मनमुराद फिरावं अशी इच्छा किंवा भावना जपणाऱ्या प्रत्येकासाठी हा चॅनल आहे.