Margee UPSC MPSC

ओले मूळ भेदी| खडकाचे अंग|
अभ्यासाशी सांग | कार्यसिद्धी||

कालाय तस्मै नमः

काळ ही मोठीच गोष्ट. आजचा काळ तर कठीणच.
सर्वार्थाने. या काळाने जणू Margee-मार्गीला आकार दिलाय.
काही गोष्टी मोठ्याने ,स्पष्ट उच्चारणसाठीची गरज या काळाने निर्माण केली. त्या काळाचे अपत्य म्हणजे मार्गी UPSC/MPSC initiative घेऊन अशा काळात मी आपल्यासमोर येतोय. सन 1997 पासून श्रीकर परदेशी, अभिनय कुंभार, अजित जोशी ,शीतल उगले ,मोक्षदा पाटील, सोहेल काझी ,वैशाली पतंगे, रश्मी झगडे, नेहा देशपांडे, ऋषिकेश पत्की, प्रशांत गावंडे, प्रशांत रोकडे, सचिन शिंदे , अमित कदम आणि अलीकडे अर्चना वानखेडे.2019 पर्यंतच्या अनेक IAS/IPS विद्यार्थ्यांची नावे सहजच आठवतात.
हे आणि कितीतरी घडवलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी!
मार्गी च्या रूपाने व्यापक स्वरूपात विस्तृत काम घेऊन आपल्यापर्यंत येतोय.
आत्तापर्यंत मी आपल्याशी कृतीतूनच बोललोय!
भूमिका म्हणाल तर हीच!
प्रवीण चव्हाण.