पांडुरंग हरी


आयुष्य भटकण्यात घालवले तर म्हातारपणी इच्छा झाली तरी शरीर नामस्मरण करायला साथ देत नाही.
आत्मसुःख हे अंतःकरणाच्या निर्मळतेवर अवलंबून आहे तर
विषय सुःख हे शरीराच्या अवस्थेवर अवलंबून आहे.
शरीराची बाह्य अवस्था अंतरीक अवस्था सक्षम करुन आहे तोपर्यंतचं आत्मसुःखासाठी संत संगतीचा लाभ घ्यायला पाहिजे.
तारुण्यातचं विवेकाने संत सदगुरु कडून ज्ञानप्रकाश लाधला तर भक्ती सिद्ध करता येणे शक्य आहे.
शरीर आणि विषय भोग हे दोन्ही नश्वर आहेत हे माहित असूनही अनमोल मानवजन्म
हरिभजनाविण वाया जात आहे ही खंत वाटायला हवी.
म्हणून आयुष्य वाया न घालवता
आत्मसुःखासाठी सावध झाले पाहिजे.
*हरिभजनावीण काळ घालवू नको रे।*____
*अंतरीचा ज्ञानदीवा मालवू नको रे।।*
*🙏शुभ चिंतन 🙏🚩🚩🚩