सुखी जीवन कसं जगावं? आयुष्य हे जितकं सुंदर आहे, तितकच खडतरही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दु:खा चे क्षण येत असतातच. प्रत्येक व्यक्तीच्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक विचार येत असतात. आज काल प्रवचनातून विचार परिवर्तनाचे धडे दिले जातात. धर्माचा अर्थ एकच आहे परिवर्तन. जीवनाचेच दुसरे नाव संघर्ष आहे. जीवनात संकटे येणं स्वाभाविक आहे. दु:खाचा अंध:कार दूर झाल्यानंतर सुख प्राप्ती होते.
जर जीवनात सुख-शांती आणि आनंद प्राप्त करायचा असेल तर परमेश्वराचे नामस्मरण करत प्रामाणिकपणे आपला मार्ग चालावा लागेल. जीवनाची प्रत्येक अवस्था किंवा परिस्थिती ही परमेश्वराची मर्जी समजूनच तिचा स्वीकार केला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जीवन सुखी झाल्याचे असे जाणवेल.