बुद्धितरंग, आनंद अस्तित्वाचा Joy Of Existence

नमस्कार मित्रांनो. मी अजय जोशी आळंदीकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आपल्या "बुद्धीतरंग" यूट्यूब चैनल वर.
या पृथ्वीतलावर शारीरिक क्षमतांच्या बाबतीत इतर प्राणी निश्चितच मानवाच्या कैक पटींनी पुढे आहेत मात्र तरी मनुष्य प्राणी आज या पृथ्वी नावाच्या ग्रहाचा अनभिषिक्त सम्राट बनला आहे याचे कारण मानवाची अत्यंत कुशाग्र बुद्धी आणि त्याची विचार करण्याची असाधारण क्षमता.
मानवाच्या बुद्धीने आणि त्यातून अविरत, अखंड व अमर्याद बाहेर पडणाऱ्या विचाररूपी तरंगांनीच आज मानवाला इतर प्राण्यांच्या तुलनेत अत्यंत उच्च अशी अवस्था प्राप्त करून दिलेली आहे आणि म्हणूनच मानवाच्या दृष्टीने त्याच्या सर्वांगीण विकासाला सहाय्यभूत होणारी गोष्ट बुद्धी आणि त्यातून निघणारे अमर्याद विचार तरंग म्हणजेच "बुद्धीतरंग"
अनादिकालापासून चालत आलेल्या ह्या वैचारिक विकासाच्या महायज्ञात आपलाही अल्प का होईना पण सहभाग असावा या उद्देशाने विविध वैयक्तिक, सामाजिक, वैज्ञानिक तसेच आध्यात्मिक विषयांवर विचारमंथन करण्याचा अल्पसा प्रयत्न आपण करणार आहोत तेव्हा लाईक करा सबस्क्राईब करा तसेच शेअर करायला विसरू नका "बुद्धीतरंग"