भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते.
🙏 श्री स्वामी समर्थ महाराज 🙏