वसंत शेवगा शेती !

वसंत शेवगा शेती या शेतकरी बांधवांच्या युट्यूब चैनेलवर सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचे स्वागत आहे, मी सात वर्षांपासून पूर्णवेळ शेवगा शेती करत आहे, शेवगा शेती करत असताना आम्ही दररोज नवनवे प्रयोग करत असतो, अवघड शेवगा शेती आम्ही खूप सोप्या पद्धतीने करतो व दरवर्षी गुणात्मक व संख्यात्मक उत्पादन घेऊन आम्ही बाजारपेठेत स्वतःचे नाव निर्माण केले. आजवर मी दोन हजारहून अधिक शेतकरी मित्रांचे संघटन केले, मी माझ्या वसंत शेवगा शेतकरी बांधवाना फोनवरून व्हाट्सएप ग्रुपवर तसेच ऑनलाईन वेबिनार घेऊन मोफत मार्गदर्शन करत असतो. वसंत शेवगा शेती म्हणजे ज्ञानाचे भंडार आहे, इथे आपले संपूर्ण समाधान केले जाते, "शेवगा शेती एक वरदान !" हे पुस्तक शेतकरी बांधवासाठी मागील वर्षी उपलब्ध केले आहे, आजपर्यंत पाच हजार शेतकरी बांधवानी पुस्तकाच्या प्रति घेतल्या व माझं कौतुक केले त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे.