मराठी अभ्यास केंद्र ही संस्था मराठी शाळा, उच्च शिक्षणातील मराठी, न्यायालयीन मराठी, माहिती तंत्रज्ञानात मराठी आणि मराठीसाठी माहितीचा अधिकार, अशा विविध कृतिगटांच्या आधारे गेली २० वर्षे अविरत कार्यरत आहे.
गुणवत्तापूर्ण मराठी शाळांसाठी पालकांनी आग्रही भूमिका घ्यायला हवी, पालकांचे सक्षमीकरण करायला हवे याकरताआम्ही २०१७ पासून ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन'आयोजित करत आहोत. मातृभाषेतील शिक्षणाचे सर्वच दृष्टिकोनातून सिद्ध झालेले महत्त्व, मराठी शाळांकडे पालकांनी गैरसमजुतीतून फिरवलेली पाठ, उदासीन शासन अशा पार्श्वभूमीवर पालकांचे एकीकरण करून मराठी शाळांचे सक्षमीकरण करणे हा आमचा उद्देश आहे.
या यूट्युब चॅनेलवर आपण या संमेलनांतील सर्व सत्रांचे व्हिडिओ बघू शकाल. ही केवळ सुरुवात असून अशी संमेलने राज्यात इतरत्र घेण्याची योजना आहे. यासाठी डॉ. वीणा सानेकर यांच्या अध्यक्षतेखाली पालक महासंघाची स्थापनाही करण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
मराठी अभ्यास केंद्र - ७२०८१ ८६३५३
डॉ. दीपक पवार - अध्यक्ष ९८२०४३७६६५
आनंद भंडारे - ९१६७१८१६६८