अंबिका शैक्षणिक संस्था नाशिक

अंबिका मित्र मंडळ नाशिक या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री बाळासाहेब विनायक पाटील सचिव श्री संदीप बाळासाहेब पाटील या संस्थेच्या नाशिक शहरात कामगार वस्तीत पाच शाखा आहेत या संस्थेमार्फत कामगार वस्तीतील मुलांना एक रुपयात प्रवेश या अभिनव संकल्पनेतून शाळांची निर्मिती झाली या अभिनव कल्पनेला सर्व कामगार वस्तीतून प्रतिसाद मिळाल्यामुळे आज संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते तसेच विद्यार्थी हे दैवत मानून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी सदैव अंबिका मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच सचिव नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम शाळांमध्ये राबवत असतात या संस्थेच्या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थी आज समाजातील विविध विविध पदांवर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत