Labhdai Vastu - पंडित श्री.व सौ.पलंगे

या चॅनल तर्फे वास्तुशास्त्र व वास्तुशास्त्राप्रमाणे इंटिरियर रेनोव्हेशन या विषयावर सविस्तर माहिती प्रश्नोत्तरां च्या स्वरूपात आमच्या प्रत्यक्ष कामाच्या अनुभवानुसार माहिती देणार आहोत. यामध्ये आम्ही पंडित श्री व सौ पलंगे लिखित लाभदायी वास्तुरचना, वास्तुशास्त्र शंकासमाधान व वास्तुविषयक 250 सल्ले या पुस्तकांच्या तसेच आम्ही महाराष्ट्रभर घेत असलेल्या "वास्तु करा हो लाभदायी" या विषयावर व्याख्यानात व्याख्यान झाल्यावर श्रोत्यांनी विचारलेल्या शंका व प्रश्न यांचे संकलन करून अशा महत्वाच्या 200 प्रश्न व शंकांचे लाभदायी वास्तु या यूट्यूब चैनल वर व्हिडिओ मालिकेच्या स्वरूपात आणत आहोत.यापूर्वी आम्ही वेगवेगळ्या वृत्तपत्रात व मासिकांमध्ये-लोकमत पुढारी संध्यानंद प्रभात अशा विविध वृत्तपत्रांमध्ये वास्तुशास्त्र शंका समाधान या सदराखाली लेखमालिकेच्या स्वरूपात लिहिले आहेत .या मालिकांना वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ते पाहता या लेख मालिका व्हिडिओ च्या स्वरूपात लाभदायी वास्तु या यूट्यूब चैनल वर प्रसारित करीत आहोत त्याचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा हीच इच्छा.या चॅनेलवर जवळजवळ २००व्हिडिओंचा समावेश करीत आहोत.