मी एक गृहिणी, माझी ओळख ‘मी’च, एक घर सांभाळणं हे एखादा उद्योग सांभाळण्याइतकंच क्लिष्ट काम आहे, त्याला कधीच कमी लेखू नये. ती अत्यंत अभिमानाने सांगण्यासारखीच गोष्ट आहे, मात्र ते करताना गृहिणीने आपलं ‘स्वत्व’ मात्र कधीही हरवू नये.