DD News Marathi

सध्याच्या आधुनिक डिजीटल युगात प्रसारमाध्यमांचे उदंड पीक आलं आहे. जी प्रस्थापित माध्यमे आहेत, ती विशिष्ट विचाराने आणि व्यक्तिशी बांधली गेली आहेत. अनेक माध्यमांवर भांडवलदार आणि जाहिरातदारांची मालकी प्रस्थापित झाली आहे. तेव्हा, सामान्य माणसांच्या जीवन जगण्या-मरणाशी संबंधित अनेक गोष्टी मुख्य प्रवाहाच्या माध्यमांमध्ये चर्चेत येत नाहीत. प्रत्येक ठिकाणी अनेक घटना, घडामोडी घडत असतात. त्या अचुकपणे, निरपेक्षपणे आणि निप्षक्षपणे जनतेसमोर येत नाहीत.

तेव्हा, समाजातील सामान्य नागरिकांचा आवाज बनून, समाजातील चांगल्या कर्तृत्ववान लोकांना समाजासमोर आणण्याच्या उद्देशाने आम्ही पत्रकारितेमध्ये डीडी न्युज मराठी (DD News Marathi) म्हणजेच डिजीटल दवंडी न्युज मराठी च्या माध्यमातून एक छोटासा प्रयोग करीत आहोत. आम्हाला आपली साथ हवी आहे. आम्ही निश्चितपणे आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करु.

आम्हाला पाठिंबा देण्यासाठी व आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला Subscribe करायला विसरु नका.

कळावे. धन्यवाद...!

Team DD News Marathi

#ddnewsmarathi