Ratnakar Narayan Gaikwad .Panhala.

रत्नाकर नारायण गायकवाड. पन्हाळा. मी रत्नाकर नारायण गायकवाड .माणसाच्या जीवनात असणारे नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करेन ,तसेच ऐतिहासिक ठिकाणे यांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करेन तसेच ऐतिहासिक वास्तू ,किल्ले यांचे जतन करावे याचा संदेश देत राहील .मानवी जीवनात हास्य व आनंद आणण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करेन. या चॅनेलच्या माध्यमातून मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. खेळ ,साहित्य, क्रीडा ,संस्कृती, सण, उत्सव यांच्याबद्दल एक चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेन ,जास्त करून आपली ऐतिहासिक भूमी पुन्हा प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न करेन. तसेच विनोद हा मानवी जीवनाचा अविभाज्य अंग आहे, त्यास अनुसरून मानवी जीवनात हास्य व आनंद आणण्याचा व रंग भरण्याचा प्रयत्न करेन. भारत किंवा महाराष्ट्र अनेक साधुसंतांची भूमी आहे. तेव्हा कोणताही भेदभाव न करता एक चांगले विचार मांडण्याचा प्रयत्न करेन आपल्या आसपास अनेक घटना घडत असतात त्या कॅप्चर करून जगासमोर आणायचे आहेत .जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भारत. वंदे मातरम!