कोणतीही कला शिकतांना/ रांगोळी काढताना सकारात्मक ऊर्जा मिळते. Lockdown च्या काळात याच छंदांनी मला नकारात्मकतेपासून दूर ठेवले. तेव्हाच मनात विचार आला की, घरा बाहेर न पडता सहज उपलब्ध साहित्यातून सोप्या पद्धतीने
सुंदर कलाकृती निर्माण करण्याचे कौशल्य ईतर मित्रासोबत वाटून घेता आले तर.. त्यांना ही तणावापासून दूर ठेवता येईल. याच एका कल्पनेने विडिओ बनविण्याचे ज्ञान नसतानाही या प्रवासाला सुरवात झाली. विडिओ उत्तम व्हावे यासाठी मीही शिकते आहे तसेच मला जे जे सकारात्मक ऊर्जा देते ते ते तुमच्या पर्यंत पोहचावे हा प्रयत्न आहे.
या प्रवासात तुम्हा सगळ्यांची साथ खूप महत्त्वाची आहे. तुमच्या प्रतिसादामुळेच मी अधिकाधिक सोपे सुंदर कलाविष्कार सादर करू शकते. तेव्हा भरभरून प्रतिसाद द्यायला कंजूषी करू नका.
शिकण्याचा आणि शिकविण्याचा प्रवास सुखकर होवो
This YouTube channel is about different forms of art, simple art which you can do it yourself. The purpose is to elaborate simple and easy way to art craft and rangoli. This will help you during different festivals and to spend your time in positive way.