पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या,सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या अशा या ऐतिहासिक देवालयाची स्थापना इसवी सनाच्या नवव्या शतकाच्या आसपास झाली.या देवीची मूर्ती स्वयंभू आहे.लोककथेनुसार ही मूर्ती शिवाजी महाराजांच्या काळातील असून मराठा साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा शिवाजी महाराजांनी पुण्यातील या भूमीवर सोन्याचा नांगर फिरविला,त्यावेळेस ही मूर्ती सापडली असे म्हणतात. बुधवार पेठेत त्याच जागी तेंव्हापासून आजतागायत हे मंदिर आहे.या मंदिराचा समावेश पुणे महानगरपालिकेच्या प्रथम श्रेणी वारसा स्थळांच्या यादीत केला आहे.या देवीची मूर्ती स्वयंभू आहे. लोककथेनुसार ही मूर्ती शिवाजी महाराजांच्या काळातील असून मराठा साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा शिवाजी महाराजांनी पुण्यातील या भूमीवर सोन्याचा नांगर फिरविला, त्यावेळेस ही मूर्ती सापडली असे म्हणतात. बुधवार पेठेत त्याच जागी तेंव्हापासून आजतागायत हे मंदिर आहे. या मंदिराचा समावेश पुणे महानगरपालिकेच्या प्रथम श्रेणी वारसा स्थळांच्या यादीत केला आहे.