बरची नृत्य , गोफ नृत्य, लेझीम आणि इतर नृत्यप्रकार ज्ञान प्रबोधिनी गणेशोत्सव २०२४

Описание к видео बरची नृत्य , गोफ नृत्य, लेझीम आणि इतर नृत्यप्रकार ज्ञान प्रबोधिनी गणेशोत्सव २०२४

गेली ३ वर्ष धनकवडी भागातली अनेक मंडळं प्रतिष्ठापनेची मिरवणूक संयुक्त पद्धतीने करतात. एकाच रथावर सर्वांच्या गणेशमूर्ती असतात. अश्या विधायक बदलाच्या प्रयोगात प्रबोधिनी पहिल्यापासूनच सहभागी आहे.

यंदाच्या उत्सवात मंडळाने सामाजिक भान जपत ४ जिल्ह्यातले वनवासींचे गट निमंत्रित केले होते. गोफ नृत्य, लेझीम आणि इतर नृत्यप्रकार करत या गटाने मिरवणुकीत वेगळाच रंग भरला.

धनकवडीचा मुख्य चौक म्हणजे या मिरवणुकीचा मानबिन्दु! अश्या ठिकाणी या वनवासी बांधवांना मुख्य आकर्षण असण्याचा मान देणं हाच त्यांच्या लोककला जपण्याच्या संघर्षाला दिलेली दाद असणार होती. त्यांच्या प्रमुखाला विश्वास दिला की प्रबोधिनीचा संपूर्ण गट बाजूनी गोलात उभा राहून तालाची साथ देईल, तुम्ही मध्यभागी सादरीकरण करा.

त्यानंतर झालेला जल्लोष अभूतपूर्व होता! ४ ढोल घेऊन आलेल्या गटाला अचानक ४० ढोलांचा ताल मिळाला. मनोरे, नाच, गोफ याची रंगत पूर्ण धनकवडी बघत होती. त्या ठोक्यांच्या हुंकारात महाराष्ट्राचा वनवासी महानगरात ठेक्यात नाचत होता. जाताना त्या प्रमुखाचा "धन्यवाद" अख्ख्या मिरवणुकीचा आनंद एका शब्दात देऊन गेला.

शेवटी प्रबोधिनीचं रिंगण आणि केवळ त्यात बरोबर वाजवण्यासाठी आलेले आपले शंभूसुताय पथकातले मित्र यांनी उडवलेला धुरळा.. केवळ अविस्मरणीय!

एकात्मता हा प्रबोधिनीच्या कामाचा अविभाज्य भाग आहे. माध्यमांनी मर्यादून न जाता असा गट बरोबर असताना त्यांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणं हे प्रबोधिनीच्या कामाचा भागच! ते सामर्थ्य आहे या उत्सव आणि उपक्रमाचं.. दर गणेशोत्सव नवीन दर्शन घडवतो.

Комментарии

Информация по комментариям в разработке