Namaskar, Welcome to BharatAgri.
Download BharatAgri: https://bharatagriapp.onelink.me/ydvW...
For any farming related queries, please chat on BharatAgri App
============================================================
♻️ बदलते वातावरण, पीकपद्धती आणि पीक उत्पादन वाढीसाठी किटकनाशकांचा अवास्तव वापर या मुळे किडींमध्ये व त्यांच्या प्रादुर्भावामध्ये वाढ होत आहे तसेच त्या किडींमध्ये कीटकनाशके पचवण्याची शक्ती निर्माण झाली आहे. 😱
🐛 फक्त कीटक पिकांचे २७% ते ४२ % पर्यंत नुकसान करू शकतात. कीटक नियंत्रणाच्या जैविक पद्धतीमध्ये वनस्पतींपासून घरच्याघरी तयार करता येणारी कीटकनाशके, जैविक घटकांवर आधारित कीटकनाशके यांचा समावेश होतो. 👍
👉 ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍
जैविक कीटकनाशके कसे तयार करावे
⭕ वनस्पती किंवा प्राण्यांपासून तयार करता येणारी कीटकनाशके -
👉 निंबोळी अर्क, निंबोळी तेल, करंज तेल, अमृतपाणी, दशपर्णी अर्क, फिश ऑइल, ब्रम्हास्त्र अर्क या सारख्या कीटकनाशकांचा समावेश होतो. या कीटकनाशकांचा वापर रसशोषक किडी, अळ्या यांच्या नियंत्रणासाठी होतो.
🔰 जैविक घटकांवर आधारित कीटकनाशके-
👉 यामध्ये बुरशी, जिवाणू यांचा वापर होतो. किडीनुसार जैविक नियंत्रचा जैविक पर्याय खालीलप्रमाणे -
🔹 जिवाणू - बॅसिलस थुरीनजनायसिस (डायपेल, हाल्ट, बायोपिट, डेल्फीन )
👉 ह्याचा वापर पाने खाणारी आळी, लष्करी आळी, चौकोनी ठिपक्यांचा पतंग, केसाळ आळी या सारख्या किडींच्या नियंत्रणासाठी होतो. प्रमाण - १५ ग्राम प्रति पंप
🔹 व्हायरस (विषाणू) - एनपी व्ही व्हायरस (बायो व्हायरस एच, हेलिओसील, हॅलोसाईड, स्पोडोसाईड)
👉 ह्यामध्ये घाटे आळी साठी - एच. ए. एनपी व्ही आणि पाने खाणाऱ्या आळी साठी (एस. एल. एनपी व्ही) यांचा वापर होतो.
प्रमाण - १०० मिली प्रति एकर
🔹 बुरशी -
👉 यामध्ये खालील बुरशीनाशकांचा वापर होतो
🛡️ ब्यूव्हेरिया बॅसियाना - (डॉ. बॅक्टोज ब्रेव्ह,बायो रिन, लार्वो सिन ), व्हर्टिसिलयम लेकॅनी ( डॉ. बॅक्टोज व्हर्टिगो)
👉 याचा वापर रस शोषक किडी, कोळी , केसाळ आळी, लोकरी मावा या सारख्या किडींच्या नियंत्रणासाठी वापरतात.
प्रमाण - १ लि प्रति एकर
♻️ मेटारायझियम ऍनिसोप्लि - (डॉ. बॅक्टोज मेटा)
👉 याचा वापर वाळवी, हुमणी, नाकतोडे, तुडतुडे, भुंगे यांच्या नियंत्रणासाठी होतो.
प्रमाण - १ ली प्रति एकर
🌟 अधिक माहितीसाठी भारतअॅग्री अॅपमधील संवादवर क्लिक करून भारतअॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍
Agriculture,Indian Farmers,Smart Farmer,Smart Farming,Farming,farmers,news,agriculture news, जैविक कीटकनाशके कसे तयार करावे, जैविक कीटकनाशक, organic insecticide, jaivik keetnashak kase tayar karave, jaivik keetnashak, जैविक कीटनाशक, organic farming, जैविक कीटकनाशके माहिती, jaivik burshi nashak, jaivik burshi nashak kaise banaye, organic pesticide, सेंद्रिय शेती कशी करावी, सेंद्रिय शेती
Информация по комментариям в разработке