महाराष्ट्रातल्या विजयानंतर Narendra Modi यांचं Waqf Board बद्दल विधान, वक्फ कायदा रद्द होणार ?

Описание к видео महाराष्ट्रातल्या विजयानंतर Narendra Modi यांचं Waqf Board बद्दल विधान, वक्फ कायदा रद्द होणार ?

#BolBhidu #WaqfBoard #PMModi

"महाराष्ट्राने विकसित भारताचा संकल्प आणस्ती मजबूत केला. मी देशभरातील भाजपच्या आणि एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. मी सर्वांचे अभिनंदन देखील करतो. मी एकनाथ शिंदे, माझे मित्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे देखील कौतुक करतो." हे शब्द आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व असा विजय मिळवल्यानंतर पंतप्रधानांनी दिल्लीमध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांसमोर बोलताना हे शब्द वापरले. याही पुढे जाऊन ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे अशी महान व्यक्तींच्या धरतीने पूर्वीच सर्व विक्रम मोडले आहेत. आम्ही वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करणार आहोत"

यावरून परत एकदा वक्फ कायदा चर्चेत आला आहे.. आज आपण माहिती घेऊयात याच वक्फ बोर्ड कायद्याची त्यातील संभाव्य बदलांची.. भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी जनधन योजना आणली, जीएसटी आणला, नोटबंदी केली, कश्मीर मधून कलम 370 हटवले, CAA साठी पावले टाकली, राज्यांद्वारे समान नागरी कायदा लागू करायला सुरुवात केली आणि आता सरकार तयारी करत आहे वक्फ बोर्ड कायद्यामध्ये बदल करण्याची. अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी मागेच वक्फ अमेंडमेंट बिल लोकसभेत सादर केलं होतं... विधेयकाचा उद्देश केंद्रीय पोर्टलच्या माध्यमातून वक्फ बोर्डाच्या मालमत्ता, संपत्तीची नोंदणी करण्यात सुलभता आणण्याचा आहे असं सांगितलं जात आहे..

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке