Rajmachi Fort Vlog|Part-1|Marathi Travel Vlog 🚩

Описание к видео Rajmachi Fort Vlog|Part-1|Marathi Travel Vlog 🚩

राजमाची हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान हा किल्ला सहजगत्या दिसतो. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ एप्रिल, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर 'उल्हास नदीचे खोरे' म्हणून ओळखला जातो.याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते.याच 'उल्हास नदीच्या खोऱ्यांच्या प्रदेशात मुंबईपुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. लोणावळ्याहून तुंगार्लीमार्गे राजमाचीला येताना वाटेतच गडाच्या वेशीजवळ एक वीरशिल्प व स्मृतीशिळादिसते. जवळच तटबंदीचे व बुरुजांचे अवशेष तसेच गणपति आणि मारुतीचे लहान मंदिर आहे. तेथून पुढे मार्ग श्रीवर्धनगडाला वळसा घालून किल्ल्याच्या माचीवरील 'उधेवाडी' गावात येतो. गावात मारुतीचे मंदिर आहे. गावाच्या उत्तरेस असलेल्या खिडकीच्या वाटेने कोकणात कोंढाणे लेणी कडे उतरता येते. उधेवाडीच्या दक्षिणेस देवराई असून पलिकडे महादेवाचे जूने मंदिर व उदयसागर तलाव आहे. ह्या तलावावर एक शिलालेख असून तलावाशेजारी चुणा मळण्याचा घाणा व दगडी चाक आहे. महादेव मंदिरामागील पठारावर काही स्मृतीशिळा आहेत. पश्चिमे दिशेला कोकण दरवाजाचे अवशेष आहेत. श्रीवर्धन व मनरंजन ह्या दोन्ही दुर्गांच्या मधील खिंडीत भैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिरापुढे दीपस्तंभ व काही मुर्त्या आहेत. मंदिरा समोरून श्रीवर्धनगडावर तर मंदिरामागून मनरंजनगडावर वाट जाते. पायी लोणावळ्याहून तुंगार्ली मार्गेः लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे राजमाची गावात पायी जाता येते. ही वाट एकदंर १५ कि.मी लांबीची आहे.वाटेने किल्ल्यावर जाण्यास ३ ते ४ तास लागतात.
पायी कर्जतहून कोंदीवडे मार्गेः कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने किंवा गाडीने यावे. कोंदिवडे येथून खरवंडी मार्गे किल्यावर जाणारी पाउलवाट उभ्या चढाची आहे. किल्यावर पोहोचण्यास सुमारे ३ तास लागतात.
गाडी मार्ग : लोणावळा किंवा खंडाळा येथून कुणेगाव - फणसराई मार्गे गडावर मोठी चारचाकी किंवा दुचाकी गाडीने उधेवाडी ह्या गडाच्या माचीवर वसलेल्या गावात पोहोचता येते. हा मार्ग कच्चा मातीचा असून काही ठिकाणी थोडे डांबरीकरण केलेले आहे. तसेच ओढ्यांवर पुलही बांधण्यात आलेले आहेत.

Google map location- https://maps.app.goo.gl/bUgypzkV1zm3u...

Комментарии

Информация по комментариям в разработке