जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये मुळव्याध, फिशर, हर्निया, स्तनातील गाठी, भंगदर, गुदभ्रंश, लिपोमा, नख काढणे, हायड्रोसील, पा. सायनस, कान शिवणे, त्वचेचे विकार, तसेच मोफत ब्लड प्रेशर आणि शुगर तपासणी, शरीरातील वेगवेगळ्या गाठींची तपासणी व उपचार तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन श्रीमती. रंजनाताई टिळेकर (माजी नगरसेविका) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. वृषालीताई कामठे (माजी नगरसेविका), सौ. संगीताताई ठोसर (माजी नगरसेविका), सौ. प्रीतीताई बधे (सामाजिक कार्यकर्त्या), सौ. अर्चनाताई जगताप (सामाजिक कार्यकर्त्या), सौ. अनिताताई कामठे (अध्यक्ष, तनिष्का ग्रुप, कोंढवा) आणि सौ. विद्याताई धांडेकर (सामाजिक कार्यकर्त्या) उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून श्रीमती. रंजनाताई टिळेकर म्हणाल्या, "स्त्रीचे आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळते. जर ती निरोगी आणि सक्षम असेल, तर ती संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य राखू शकते. त्यामुळे महिलांसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला, त्याबद्दल महिला डॉक्टर डॉ. मीना शेख आणि डॉ. शर्मिला कामठे यांचे मनःपूर्वक आभार."
यावेळी सौ. वृषालीताई कामठे आणि सौ. संगीताताई ठोसर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
या शिबिराचे संपूर्ण नियोजन डॉ. शर्मिला कामठे आणि डॉ. मीना शेख यांनी केले. शिबिरादरम्यान सुमारे ४५ महिला रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. तसेच ब्लड प्रेशर, शुगर, इसीजी आणि इतर विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या.
हा कार्यक्रम ८ मार्च २०२५ रोजी ह. भ. प. पुंडलिक टिळेकर सभागृह, गोपीनाथ मुंडे व्यायामशाळा, हगवणेनगर, VIT कॉलेजजवळ, कोंढवा बुद्रुक, पुणे - ४११०४८ येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. मीना शेख, डॉ. शर्मिला कामठे, डॉ. प्रज्वल, चंदा सिस्टर, प्रतीक्षा सिस्टर, नम्रता, महेश घाडगे आणि हर्षल फणसे यांचे विशेष सहकार्य लाभले.
📌 आयोजक:
डॉ. कामठे पाईल्स क्लिनिक, सर्जिकल हॉस्पिटल व रिसर्च सेंटर
#womensday #healthcamp #freehealthcheckup #womenhealth #pilestreatment #fissurecare #herniatreatment #breasthealth #Hydrocele #bloodpressurecheck #SugarCheckup #HealthcareForWomen #medicalcamp #surgicalcare #wellness #preventivecare #healthawareness #supportwomen #communityhealth #DoctorPile #drkamthepilesclinic #puneevents #socialwelfare
📞 Book an appointment on
+91 8888844185 / 8888866185
.
🌎 https://www.doctorpile.com
.
📍 First floor, Indraprastha Landmark,
Gangadham, Nr. Shantinagar Society,
Kondhwa Bk, Pune - 411048
Follow us on-
Facebook- / dr.kamthe
Instagram- / drkamthepilesclinic
Visit our website - https://www.doctorpile.com/
Информация по комментариям в разработке