विषय मराठी महानुभव पंथ

Описание к видео विषय मराठी महानुभव पंथ

अधिक माहितीसाठी लिंक-   • दहावी  मराठी  (गद्य) अनंतशक्ति परमेश्...  

अधिक माहितीसाठी लिंक-   • नववी मराठी (गद्य)  गुरख्याचे  नेत्रपत...  


महानुभाव पंथ मराठी साहित्यामध्ये अतिशय महत्त्वाचा संप्रदाय असून या पंथामध्ये खऱ्या अर्थाने मराठी साहित्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
बाराव्या शतकात गुंडमराऊळ उर्फ गोविंद प्रभू यांनी हा पंथ सुरू केला. नंतर हरपाळदेव उर्फ चक्रधर स्वामी यांना गोविंद प्रभूंनी दीक्षा दिली. त्यानंतर चक्रधर स्वामींनी आपल्या तत्वज्ञानाच्या व कीर्तनाच्या जोरावर या पंथाची भरभराट केली. तळागाळापर्यंत -सर्वसामान्यांपर्यंत हा पंथ पोहचविला .गावोगावी या पंथाच्या शाखा सुरू केला. अनेक अनुयायी या पंथामध्ये येऊ लागले .स्त्री पुरुष समानता या पंथात असल्याने अबालवृद्धांसाठी हा पंथ खुला झाला. चक्रधर स्वामी च्या या अत्युच्च कार्यामुळेच त्यांना महानुभव पंथाचे संस्थापक असे म्हणतात.
या पंथातील छोट्या छोट्या गोष्टी खूप बोधप्रधान आहेत. या पंथाचे तत्त्वज्ञान आपल्याला प्रभावित करते .विद्यार्थ्यांनी याची माहिती घ्यावी. आधुनिक युगात या पंथाचे तत्त्वज्ञान आत्मसात केल्याने जीवनात चैतन्य येते.

Комментарии

Информация по комментариям в разработке