मिरचीचे विक्रमी उत्पादन घेणारा तरूण शेतकरी शंभूराज घाडगे | निमसोड | सातारा | IFE

Описание к видео मिरचीचे विक्रमी उत्पादन घेणारा तरूण शेतकरी शंभूराज घाडगे | निमसोड | सातारा | IFE

Follow us:
Facebook:  / indianfarmerentrepreneurs  
Instagram:   / aniketgharge23  
Mail-id: [email protected]
----------------------------------------------------------------------------------------------
शंभूराज घाडगे(निमसोड ता.खटाव जि. सातारा)
मो.7378985636
अवघे वीस वर्षे असलेला शंभुराज हा बीकॉम या शाखेतून पदवीधर आहे. लहानपणापासून शेतीची आवड असणारा शंभूराज शिक्षण करत वडिलांना शेती मध्ये मदत करतो. वडिलोपार्जित असलेली 10-11 एकर शेतीमध्ये ऊस, मका यासारखी पिके पारंपरिक पद्धतीने घेऊन त्यातून पाहिजे असे उत्पन्न मिळत नव्हते. यासर्व गोष्टी शंभूराजच्या लक्षात आल्यानंतर शेती मध्ये आधुनिक पद्धतीने नवनवीन प्रयोग करण्याचा निश्चय त्याने केला. सुरवातीला यासर्व गोष्टींची माहिती नसताना इंटरनेटचा वापर करून वेगवेगळ्या पिकांची माहिती घेतली. यातूनच मार्च 2018 च्या अखेरीस मिरची पिकाची लागवड करण्याचा निश्चय केला. लागवडीपूर्व सर्व तयारी करून मिरची पिकाची लागवड केली परंतु महिनाभरात लागवड उशिरा झाल्यामुळे संपूर्ण पीक जळून गेले. तरीही हताश न होता यावेळी संपूर्ण माहिती काढून फेब्रुवारी 2019 मध्ये 17 गुंठ्या मध्ये एच.पी.5736 या वाणाची लागवड केली. साडेचार फूट लांबीच्या सऱ्या सोडून त्यावर मल्चिंग पेपर चा वापर करून ठिबकने पाण्याची सोय केली. मिरची वर रोगांचा पादुर्भाव होऊ नये म्हणून वेळोवेळी रोग नियंत्रक औषधांची फवारणी केली. यासाठी शंभूराज यांनी वेळोवेळी कृषीतज्ज्ञांचे तसेच जाणकार शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. विटा येथून आणलेल्या मिरचीचे वाण हे चांगले असल्याने मिरचीची वाढ ही जोमदार झाली व याचा फायदा उत्पन्न वाढीस मिळाला. व्यापारी जाग्यावरून मिरची घेऊन जात असल्याने मार्केटिंगची वेगळी गरज भासली नाही. शंभूराज यांना मिरचीतुन आतपर्यंत 6 टन एवढे उत्पन्न मिळाले आहे आणि अजून 4 टन उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यांच्या मिरचीला किलोला 60 रुपये या दराने भाव मिळाला असल्याने त्यांना आतापर्यंत तीन लाख साठ हजार एवढे उत्पन्न मिळाले असून राहिलेल्या तोड्यातून हेच उत्पन्न सहा लाखांपर्यंत मिळेल असे ते सांगत आहेत.
#IFE #Mirchi

Комментарии

Информация по комментариям в разработке