गडांचा राजा, राजांचा गड 'राजगड'
किल्ले राजगड गुंजन मावळ भागाचे संरक्षण करण्यासाठी अतिशय मोक्याच्या ठिकाणी शिवरायांनी बांधलेला एक अप्रतिम किल्ला. समुद्रसपाटीपासून १३९४ मीटर उंचीवर वसलेला राजगड म्हणजे युद्ध शास्त्राचा किंवा युद्ध कलेच्या नियमानुसार नुसार बांधलेला दुर्गशास्त्रातील स्थापत्य कलेचा आदर्श नमुना. स्वराज्याची पहिली राजधानी या दृष्टीने राजगडास विशेष महत्त्व आहे. राजगड हा सह्याद्रीतील असा एकमेव किल्ला आहे की ज्यास छत्रपती शिवरायांचा आणि आऊसाहेब जिजामातांचा २५ वर्षाचा सहवास लाभला. त्या जाणता राजाचे वागणे, बोलणे, चालणे राजगडाने जवळून न्याहाळले तसेच अनुभवले आहे. राजगडावर जाण्याकरता पाली दरवाजा, अळू दरवाजा,भिकूल्याच्या दांडाने चोर दिंडीची वाट, गुंजवणे दरवाजाची वाट मार्गसनीहून साखर,गुंजवणे मार्गे जाणारी चोरदिंडीची पायवाट अशा वाटा आहेत.राजगडावर जाण्यासाठी आपल्याला पाली दरवाजा हळू दरवाजा भिकूल्याच्या दंडाने चोर दिंडीची वाट गुंजवणे दरवाज्याची वाट अशा वाटा आहेत. आणि बऱ्याच पैकी चोर वाटा आहेत यापैकी आम्ही पाली दरवाजाने जायचे ठरवले. पाली मार्गे जाताना प्रथम आपल्याला झाडाझुडपातून जावे लागते त्यानंतर आपल्याला काही अंतर चालून गेल्यानंतर पुरातन काळातील पायऱ्या लागतात. येथून चालताना आपल्यासमोरच भला मोठा बालेकिल्ला आपल्या नजरेस पडतो. पुढे चालत गेल्यानंतर काताळात कोरलेला पाली बुरुज आहे. येथून थोडा वळसा मारून गेल्यानंतर आपल्याला पुन्हा टातर पूर्वी पायऱ्या लागतात आणि पायऱ्यांच्याच पुढे आपल्याला पाली दरवाजा पाहावयास मिळतो सुंदर असा हा पाली दरवाजा सुस्थितीमध्ये आहेत. पाली दरवाजाच्या बाजूलाच कातळाच्या तटबंदीमध्ये जंगी आहेत जेणेकरून शत्रू वरती आपल्याला पाळत ठेवता येईल. पाली दरवाजाकडून आपण महादरवाजाकडे आता चालू या महा दरवाजाकडे जाताना आपल्याला पुन्हा एक अशी खिडकी लागते तर त्या खिडकीतून रस्ता पुन्हा पहिल्या पाली दरवाजाच्या वरती येतो. याचे कारण असे की, दरवाज्याच्या तटबंदी वरूनही आपल्याला समोरच्या भागावरती लक्ष ठेवता येते आणि शत्रू वरती पाळत ठेवता येते यासाठी दरवाज्याच्या वरती सैनिकांच्या देवड्या बनवलेल्या आहेत.थोडे पुढून चालत गेल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा महादरवाजा लागतो भक्कम अशा सुस्थितीत असलेला किल्ल्याचा महादरवाजा बघितल्यानंतर बाजूलाच एक उजव्या हाताला शिलालेख आहे. यावरून हा किल्ला खूप पुरातन आहे याचा हा शिलालेख आहे.बाजूला सैनिकांच्या देवड्या आहेत. भक्कम अशी तडबंदी शाबूत आहे.पहिल्या भागामध्ये आपण पद्मावती माचीवर हत्ती तलाव, सदर, खलबदखाना, बाजारपेठ, राजवाडा, सरदारांची वाडे, आऊसाहेबांचा वाडा, सईबाईंची समाधी, पाण्याचे टाके, अंबरखाना,चोरवाट, भुयार, गुहा,त्यानंतर आपण बालेकिल्ला पाहू,बालेकिल्ल्यावर कातळ कोरीव पायऱ्या,देवडी,भुयार,अष्टकोनी महादरवाजा, जननी माता मंदिर,चंद्र तळे, ब्रह्मेश्वर महादेव मंदिर, पाण्याच्या टाक्यांचा समूह, राजवाडा, आऊसाहेबांचा वाडा, सदर,बाजारपेठ, तीन सैनिकी बुरुज, इत्यादी गोष्टी बघून आणि शिवरायांचा होत असलेला भास या सर्वांची होणारी साक्ष नजरेत आणि श्वासात साठवून सूर्यास्त होईपर्यंत थांबून राहिलो. सूर्यास्त झाल्यानंतर पद्मावती माचीवर मुक्कामाच्या दिशेने निघालो. एका दिवसामध्ये राजगड पहाणे शक्य नाही म्हणून आम्ही मुक्कामी राहिलो. आम्ही सोबत जेवणासाठी कोरडा शिधा आणि पातेले टीम देहेरगडच्या सदस्यांनी गरम गरम भात बनवला आणि गड भोजन केले. काही सदस्यांनी टेन्ट मध्ये मुक्काम केला तर काहींनी पद्मावती मातेच्या मंदिरामध्ये मुक्काम केला
सुवेळा माची आणि संजीवनी माची बघण्यासाठी पुढील व्हिडिओ भाग - २नक्की पहा.
अनुभवलेखन
शाम त्र्यंबकराव गव्हाणे
भटका सह्याद्रीचा
संस्थापक :- शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्था महाराष्ट्र राज्य.
Информация по комментариям в разработке