भूपाळी जेजुरीच्या कुलस्वामी श्रीखंडोबाची - Jejuri Khandoba Bhupali Wake Up Song - Good Morning Song

Описание к видео भूपाळी जेजुरीच्या कुलस्वामी श्रीखंडोबाची - Jejuri Khandoba Bhupali Wake Up Song - Good Morning Song

भूपाळी
रात्रीचा अंतिम प्रहर व दिवसाचा पहिला प्रहर या दरम्यानच्याकाळामध्ये सृष्टी निर्माता पालनकर्त्याला भूप रागामध्ये पद्य स्वरूपातील स्तुतीची आळवणी करून जगविले जाते त्याला भूपाळी असे म्हणतात.पेशवाई मध्ये नामांकित कवींनी रचलेल्या रचना प्रसिद्धच आहेत त्यापैकीच "घनश्याम सुंदरा..." हि होनाजी बाळाची भूपाळी सर्वांनाच माहित आहे त्यांचेच समकालीन शाहीर सगनभाऊ यांनी रचलेले पद आजही खंडोबा मंदिरामध्ये भूपाळीच्या आरंभीच म्हंटले जाते.
श्रीक्षेत्र जेजुरी येथील मंदिरांमध्ये रोज पहाटे भूपाळी म्हंटली जाते,या भूपाळीतील पदे वेगवेगळ्या कालावधीत( १८व्या / १९व्या शतकात ) वेगवेगळ्या कवींनी (सगनभाऊ,बापू वाघ्या,रामभाऊ,हरिभाऊ,नामा परीट इ.) रचलेली आहेत परंतु ती कुठेही लिखित स्वरुपात नसल्याने ज्यांना ती मुखोदगत आहेत त्यांच्याकडूनच ती ऐकायला मिळते.खंडोबाची पदे लोकगीतांची फार मोठी परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे, जात्यावरच्या ओव्या, भलरी गीते, लावणी, वासुदेव, गोंधळाची पदे, जागरणाची पदे, असे विविध लोकगीतांचे प्रकार महाराष्ट्रामध्ये पहावयास मिळतात. लोकगीतांना कुठलाही छंद अथवा मात्रा लागू पडत नाही तर साहित्यातील व्याकरणही लागू होत नाही. लोकगीते हि कुठल्या कागदावर लिहिली जात नाहीत, ती लिहिली जातात रसिकांच्या हृदयावर. हृदयाच्या अंतःकरणापासून स्फुरते आणि सहज ओठावर येते ते लोकगीताचे जन्मस्थान आणि लोकांच्या कानाला मोहवून लोकांच्या ओठी चपखलपणे बसून हृदयावर राज्य करते ते लोकगीत. श्रीखंडोबाविषयी असलेल्या श्रद्धेतून अशा अनेक नामवंत आणि अज्ञात रचनाकारांनी अनंत रचना केल्या आहेत. अनेक वर्षे उलटूनसुद्धा आजही लोकांच्या ओठावर या रचना सहजपणे येतात. हीच पदे मल्हार स्तुतीच्या जागरण या विधीमध्ये वाघ्या मुरुळी संगीत आणि नृत्यांच्या साथीने सदर करीत असतात. अशा ज्ञात अज्ञात गीतकारांची संग्राह्य पदे "देवा तुझी सोन्याची जेजुरी " संकेतस्थळावर वाचकांसाठी उपलब्ध आहेत.

प्रातःकाळी उठूनी गणपतीचे, करि विष्णू स्मरण
काशी उज्जैनी, औंढी परळी, त्र्यंबक त्रिनयन
सोमनाथ सोरटी, बद्रिकेदार रामेश्वरी स्नान
श्रीशैल्य मल्लिकार्जुन, वेरूळ मांधाता जाण
आत्मलिंग गोकर्ण तारिले, चामुंडी विश्व
भक्त अलभ्या ऋषी, स्मरावे दत्त हनुमान
मोक्षांच्या पु-या सात, हरिद्वार कांची पहा
द्वारका जगन्नाथ, पंचवटीत क्षणभरी रहा
गंगोत्री कुशावर्त, जळ निर्मळ गंगा न्हा
विठ्ठल चरणी वाहू तुळसी, भक्त करील साह्य
सगनभाऊ मारुतीस म्हणती, नाथ प्रसन्न आहे
रूपतेज दीपतेज, रवी उदयास्तव येऊ पाही
सगनभाऊ मारुतीस म्हणती, नाथ प्रसन्न आहे

श्रीक्षेत्र जेजुरी आणि श्रीखंडोबा यांच्या विषयी आपल्या मनामध्ये जी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेच्या बळावरच www.jejuri.in या संकेतस्थळाची यशस्वी वाटचाल चालू आहे. श्रीखंडोबा दैवताविषयी जे काही ज्ञान आमच्याकडे आहे, ते प्रत्येक भाविक भक्तांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. या दैवताचे वैशिष्ठ्य म्हणजे सर्व थरातील जनांना अगदी जाती धर्माचा भेदभाव न राहता सर्वांना आपलेसे वाटते. याचा प्रसार वाढावा आणि सर्व सामान्यांना आपल्या कुलस्वामी आणि कुलाचाराविषयी पुरेशी माहिती प्राप्त व्हावी या हेतूने प्रेरित होऊनच आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे.

#Jejuri, #Khandoba, #Khanderaya, #Davana, #Dawana, #Puja, #Shiralsheth #Shriyal # #Kadepathar, #Malhar, #Aarti #Mhalsakant, #Martand, # Bhairav,. #Mallanna, #Mallappa, #Mailarling, #Shankar #Mahdev, #Mhalsa, #Ghode_Uddan, #Steps, #Karha, #karhepathar, #Purandar, #Valley, #Talav, #Sadanand, #Yelkot, #Mandir, #Temple, #Jejurgad, #Upadhye_Guruji, #Jejurgad, #Mangsooli, #Mangsuli, #DevarGudda, #Guddapur, #Dharwad, #komaruvelli, #bidar, #Manikprabhu, #Satare, #Korthan, #Dhamani, #Mailar, #Dawadi #Nimgaon, #NimgaonDawadi, #JayMalhar, #Delawadi, #Shegud, #Naldurga #Gurupournima, #Chaitra #श्रावण #सगनभाऊ #होनाजीबाळा #सौराष्ट्र #सोमनाथ #बद्रीनाथ #केदार #भूपाळी #शाहीर #भूप राग #पहाटे #जेजुरी #खंडोबा #म्हाळसकांत #मल्हार #मल्हारी #मार्तंड #जेजुरगड #खंडेराया #दवणा #पूजा #आरती #रामदास #स्वामी

Комментарии

Информация по комментариям в разработке