√तीन महिन्यात लाखोंचा नफा.

Описание к видео √तीन महिन्यात लाखोंचा नफा.

श्री बाळासाहेब जिजाबा जाधव (सर)B.A.Marathi
प्रगतशील शेतकरी
मु पो कोंडेगव्हाण ता श्रीगोंदा जि अहमदनगर

🌱ढेमसे लागवड🌱
लागवड तारीख 24/01/2020
#टिंडा #दिलपसंद #ढेमसे #लागवड
ढेमसे लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी हलकी काळी मध्यम भारी जमीन चालते. शेतीची खोल नांगरट करून रोटर मारून बेसल डोस टाकावा. बेसल डोस मध्ये शेणखत,कोंबडी खत,मायक्रोन्यूट्रिएंट,निंबोळी पेंड,ह्युमिक ग्रॅन्युल्स,सेंद्रिय खते,जैविक खते 10/26/26
18/46/00
इत्यादी शेतात टाकून पुन्हा रोटर मारावा. नंतर सहा फूट अंतरावर ती बेड तयार करावेत. बेडवर ठिबक सिंचन अंथरूण चेक करून घ्यावे. नंतर मल्चिंग पेपर अंथरून घ्यावा. तीन फूट अंतरावर झिक झ्याक पद्धतीने बियांची टोकण करावी.
प्रती एकरी 800 ते 900 ग्रॅम बियाणे लागते
बियाणे लागवडीपूर्वी कोमट पाण्यात भिजवून बारा तास ठेवावे. लागवड करताना चांगले बियाणे लावावे खराब बियाणे लावू नये.
लागवडीनंतर 45 दिवसांनी मालाच्या तोंडणीस सुरुवात होते. प्रति एकरी पन्नास ग्रॅम चे सहा पाकीट बियाणे लागते. महिको सीडस् च्या ढेमसे या वाणाची लागवड केलेली आहे. ढेमसे तोडणीसाठी प्रत्येक दिवशी पाच ते सहा माणसांची गरज लागते. विक्रीसाठी सर्वोत्तम बाजारपेठ मुंबई वाशी मार्केट आहे. ढेमसे पिकाची तोडणी चालू झाल्यानंतर 45 ते 60 दिवस तोडे चालतात. प्रत्येक दिवशी सरासरी प्रति एकरी 500 किलो उत्पादन मिळते. 60 दिवसांच्या तोडणी मध्ये 25 ते 30 टन उत्पादन मिळते.सरासरी कमीत-कमी बाजार भाव 20 रुपये किलोप्रमाणे 6 लाखांचे उत्पादन मिळते.जमिनीची मशागत,लागवड,ठिबक सिंचन,मल्चिंग पेपर,बियाणे,खते,औषधे, मजुरी,बॉक्स पॅकिंग,वाहतूक असा साधारण 2 लाख 20 हजार खर्च वजा करतात प्रति एकरी 3 लाख 80 हजार रुपये निव्वळ नफा मिळू शकतो
🌱वेलवर्गीय पिकांच्या सर्वोत्तम वाढीसाठी वंडरफुल,फॉर्च्यूनेट, 100% वापरा. मिळण्याची मो.नंबर
श्री काळे साहेब
8208616871
🌱आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला आत्ताच सबस्क्राईब करा🌱
यूट्यूब
   / balirajaspecial  
फेसबुक
  / balirajaspecial  
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/balirajaspe...
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08

Комментарии

Информация по комментариям в разработке