कोहोज किल्ला (वाडा) पालघर | Kohoj Killa (wada) Palghar

Описание к видео कोहोज किल्ला (वाडा) पालघर | Kohoj Killa (wada) Palghar

कोहोज किल्ला (वाडा)

कोहोज हा किल्ला पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात आहे. वाडा-मनोर हायवेवरील हा किल्ला सर्वांचे लक्ष वेधून घेतो. वाड्यापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी विविध वाटा आहेत. नाणे गाव, वाघोटा गाव तसेच गोरे गावातून देखील जाता येते. किल्ल्यावर जाण्यासाठी साधारणता दोन ते अडीच तास लागतात

किल्ल्याचा इतिहास
शिवरायांनी कोहोजगड 1657 च्या दरम्यान जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे 12 जून 1665 च्या पुरंदरच्या तहानुसार मोगलांना जे 23 किल्ले शिवरायांनी दिले त्यात कोहोज गडाचा देखील समावेश होतो. यानंतर 11 जून 1670 रोजी मराठ्यांनी हा गड परत जिंकून स्वराज्यात आणला. संभाजीराजांच्या कारकिर्दीत मोगलांचा मानसबदार व जव्हारचा जमीनदार विक्रम पतंगराव याने 7 एप्रिल 1688 रोजी कोहोज गडाचा ताबा घेतला. पुढे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

किल्ल्यावर गेल्यानंतर खरच खूप सुंदर वाटतं. येथील इतिहासाच्या पाऊलखुणा आज ही आपल्याला जाणवतात. किल्ल्यावर एक पुरातन शिवाचे मंदिर आहे, समोरच भग्नावस्थेतील काही मूर्ती आहेत, तिथे कोरीव पाण्याचे टाके सुद्धा आहे. पुढे गेल्यानंतर किल्ल्याची तटबंदी आहे. एक बुरुज आहे.मारुती रायाचे छोटे मंदिर आहे. बाजूला तीन दगडात कोरलेले पाण्याचे टाके आहेत. दोन टाकीतील पाणी पिण्यायोग्य नाही. एक टाकी आहे त्यात पिण्यायोग्य पाणी आहे. अतिशय थंड आणि आपली तहान भागवणारा पाणी आहे
पुढे गेल्यानंतर दोन्ही बाजूला दोन बुरुज आहेत आणि मध्ये पायऱ्या आहेत. हा किल्ल्याचा महाद्वार असावा. पुढे गेल्यानंतर अजून एक मारुतीरायाचे छोटे मंदिर आहे. पुढे दोन सुळके आहेत. त्याच्या बाजूला अजून दोन पाण्याची टाकी आहेत. कालाच्या ओघात किल्ला थोडा ढासळलेला आहे.
खूप सुंदर असा किल्ला आहे. येथे खूप मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. तर नक्की या ठिकाणी भेट द्या.

Комментарии

Информация по комментариям в разработке