एकीकडे एकटे Manoj Jarange दुसरीकडे Pankaja Munde, धनंजय मुंडे, हाके एकत्र. दसरा मेळावा कोणाचा गाजला?

Описание к видео एकीकडे एकटे Manoj Jarange दुसरीकडे Pankaja Munde, धनंजय मुंडे, हाके एकत्र. दसरा मेळावा कोणाचा गाजला?

#BolBhidu #PankajaMundeDasaraMelava #ManojJarangePatilMelava

लोकसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ दोन कारणांमुळं चर्चेत आला होता, याचं पहिलं कारण म्हणजे पंकजा मुंडे आणि दुसरं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील. लोकसभा निवडणुकीदरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष उफाळून आला होता. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना थेट पाडा, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली होती. यामुळं बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली. परिणामी अटीतटीच्या लढतीत शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे विजयी झाले. या विजयात जरांगे यांचा अदृश्य हात होता, अशी टीका नंतर झाली.

लोकसभेतला हा संघर्ष ताजा असताना आज दोन्ही नेत्यांनी बीड जिल्ह्यात दोन दसरा मेळावे घेतले. हे दोन्ही नेते मेळाव्यातून काय बोलणार? याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. मराठवाड्याच्या राजकारणाची दिशा बदलणारे मेळावे म्हणून या मेळाव्यांकडं पाहिलं जात होतं. आज अखेर सावरगाव घाट इथं पंकजा मुंडे, तर नारायण गडावर जरांगेंनी आपापल्या समर्थकांना संबोधित केलं. पण हे दोन्ही मेळावे कसे पार पडले? कोण काय बोललं? सभेला कोण कोण उपस्थित होतं? थोडक्यात कुणाचा मेळावा गाजला, पंकजा मुंडे की मनोज जरांगे, पाहुयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке