विश्व आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला,नंदुरबारातूनआदिवासी विकास विभागातर्फेआदिवासी संस्कृती दर्शनरॅली

Описание к видео विश्व आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला,नंदुरबारातूनआदिवासी विकास विभागातर्फेआदिवासी संस्कृती दर्शनरॅली

नंदुरबार येथे 9 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या विश्व आदिवासी दिवसाच्या पूर्वसंध्येला, नंदुरबार शहरातून आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी संस्कृती दर्शन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला राज्यभरातील विविध भागातून आलेल्या आदिवासी कलाकारांनी सहभाग नोंदविला असून, वेगवेगळ्या भागातील आदिवासी परंपरांचे दर्शन या रॅलीतून नंदुरबारकरांना घेता आले, आदिवासी विकास विभागाच्या वतीने नंदुरबार येथे तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमासाठी राज्यभरातील आदिवासी भागातील कलाकार आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी आले असून, विविध भागातील नृत्य आविष्कार या ठिकाणी सादर करण्यात आले, या रॅलीचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी माजी खासदार हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित, यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कलाकारांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन या ठिकाणी घडविले या रॅलीत सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांचा उत्साह पाहण्यासारखा होता, राज्यातील आदिवासी संस्कृती येणाऱ्या काळात टिकून राहण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती राज्याच्या आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке