Shri. Supreet Deshpande - Tabala Solo - At LKSS.22

Описание к видео Shri. Supreet Deshpande - Tabala Solo - At LKSS.22

Nagma saath: Shri Ajoy Joglekar

दिल्ली फारुखाबाद घराण्याची तालीम लाभलेल्या सुप्रीत देशपांडे यांचा अप्रतिम तबला सोलो हे पहिल्या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. विलंबित तीनतालामध्ये अप्रतिम पेशकार, ‘धात्रक धिकीट’ कायदा तबला वादनात सादर केल्यानंतर ‘तक घिड नग’ बोलांवरील त्यांचे प्रभुत्व आणि वादनातील सफाई विशेषतः जाणवली. त्यामधील गत पं. सुरेश तळवलकर यांच्याकडून मिळाल्याचे सुप्रीत यांनी आवर्जून सांगितले. ‘धिगधिना धिगधिना धागेधा धिग धीनाना’ हे बोल अनोख्या पद्धतीने वाजवताना त्याचा समारोप तिहाईशिवाय केला आणि ती संकल्पना प्रख्यात तबलावादक उ. शेख दाऊद खां यांच्याकडून घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. फारुखाबाद घराण्याचा रेला वादन करताना त्यांनी दायां बायाचे संतुलन उत्तम राखले होते, अन्यथा बऱ्याच तबला सोलोमध्ये डग्ग्याचा विचार करण्याचे प्रमाण कमी असते. तबल्यातील अनोखे तुकडे, चक्रधार सादर केलेल्या तबला एकल वादनामध्ये सुप्रीत देशपांडे यांनी परंपरा आणि नवता या दोन्हींचा विचार केल्याचे जाणवले. अजय जोगळेकर यांची संवादिनी लेहरा साथ अप्रतिम असते त्यामुळेच ते उ. झाकीर हुसेन यांचे आवडते लेहेरा संगतकार आहेत.

रसिकांनी एकत्र येऊन संगीत ऐकण्याला गेल्या २ वर्षात संगीत रसिक पारखे झाले होते. या पार्श्वभूमीवर ३ दिवस लोणावळ्यामध्ये निवास करून कलाकार आणि संगीत रसिक एकत्र येतात आणि संगीताचा आनंद मनमुराद घेतात ही मानसिक समाधान देणारी बाब होती हे खरेच, शिवाय कोणत्याही इतर व्यवधानांचा विचार न करता फक्त संगीतावरच लक्ष केंद्रित करून त्या कलेचा आनंद लुटणे हे केवळ निवासी संगीतामुळे शक्य झाले. २५-२६-२७ मार्च २०२२ रोजी मनःशक्ती केंद्र, लोणावळा येथे संपन्न

Комментарии

Информация по комментариям в разработке