#femaleinfertility #infertilitytreatment #ayurveda #pcos #thyroid #tubalblockage #hormonalimbalance
सध्याच्या काळात प्रकर्षाने भेडसावणाऱ्या व वेगाने वाढत असलेल्या समस्यांपैकी मूल न होणे ही समस्या मोठया प्रमाणात दिसून येत आहे. आहारातील बदल, दिनचर्येतील बदल, शारीरिक नैसर्गिक प्रक्रियांना मनुष्यातर्फे केला जाणारा विरोध, अनेक मानसिक विकार, चुकीची लाईफस्टाईल, नेहमी असणारी चिंता, ताण तणाव, दारू – तंबाखू – गुटका या व्यसनांचे प्रजनन संस्थेवर होणारे गंभीर दुष्परिणाम यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण तीव्रतेने वाढत आहे. हा एक गंभीर – चिंतेचा विषय होत आहे. हा विषय सामाजिक प्रतिष्ठेचा व भावनिक गुंतवणुकीचा असल्याने काही लोक गरज नसतांना या समस्ये विषयी गोपनियता (गुप्तता) बाळगतात, त्यामुळे या रूग्णांवर वेळीच उपचार करणे कठीण जाते.
स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे
गर्भाशय व अंडाशय (Ovary) अतिशय लहान असणे. जागेवरून सरकलेले असणे, या दोन्हींवर सूज असणे, लग्नाच्या आधीपासूनच किंवा लग्नानंतर पाळी खूप अनियमीत असणे, पाळीत अंगावरून अतिशय कमी प्रमाणात जाणे, गाठी जाणे, त्या काळात पोट व कंबर अतिशय दुखणे, छाती दुखणे. वारंवार अंगावरून पांढरे जाणे / लाल जाणे, गर्भाशयात जखम असणे, गाठी (Uterine Fibroid) असणे. हार्मोन्स (Harmones) चे प्रमाण कमी अधिक असणे, वारंवार गर्भपात होणे, गर्भात अनेक दोष निर्माण होणे. (Congenital Anamoly) दिवस राहिलेले नसतानाही स्तनांतून चिकट स्त्राव येणे.
At Shri Kamala Ayurved Hospital, Ahmednagar, Dr. Mahesh Mulay & Dr. Anshu Mulay provides holistic ayurvedic treatment for female infertility issues with Panchakarma
बीजदोष (Genetic Disorders)
स्त्री अथवा पुरूष बीजामध्ये असलेल्या सूक्ष्म दोषांमुळे विकृत गर्भ निर्माण होणे. (Congenital Anamoly) वारंवार गर्भपात (Habitual abortion) होणे, मृत गर्भ निर्माण होणे.
Torch Test Positive असणे:
पतीची किंवा पत्नीची अथवा दोघांची टॉर्च टेस्ट पॉझिटीव्ह असल्याने दिवस न राहणे अथवा वारंवार गर्भपात होणे. या रूग्णांच्या बाबतीत पंचकर्मांनी दोघांच्या शरीराची सूक्ष्म स्तरावर शुध्दी करून स्त्रियांमध्ये उत्तरबस्ती व नंतर पोटातून सलग तीन महिने औषधे देऊन गर्भधारणेस परवानगी दिली जाते व खात्रीलायक उपचार केले जातात.
PCOD / PCOS -
अंडाशयांवर (ovaries) सूज व Harmones (अंतस्त्रावांच्या)असमतोलामुळे लग्नानंतर किवां लग्नाच्या आधीपासूनच पाळी खूप अनियमित असणे, स्त्रीबीज तयार न होणे, ते वेळेवर न फुटणे, वजन खूप वाढणे, ओठांवर हनुवटीवर दाढीसारखे केस येणे. स्त्रियांमधे आढळणाऱ्या वंध्यत्वाच्या कारणांपैकी हे एक अतिशय गंभीर कारण आहे. येथे पंचकर्म व औषधी उपायांनी निश्चित फरक पडून उत्तम संतती होते. Thyroid ग्रंथी विकारः ग्रंथीचे स्त्राव अधिक किंवा कमी असल्याने वजन वाढणे, कमी होणे, अंगावर सगळीकडे सूज येणे, मानसिक आजार, गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे.
Tubal Block :
Fallopian Tube बीजवाहक नलिका बंद असणे : प्रजनन संस्थेमध्ये खूप दिवस राहिलेल्या जंतुसंसर्गामुळे (Infection – Chronic PID) क्षयरोग(TB) झाल्यामूळे किंवा पूर्वी बऱ्या झालेल्या टीबीच्या प्रजनन संस्थेवरील गंभीर दुष्परिणामांमूळे एक किंवा दोन्ही बीजवाहक नलिका अंशत: किंवा पूर्णत: बंद असणे, हे स्त्रियांमधील वंध्यत्वाचे एक गंभीर कारण आहे. आमचे येथे यावर टयुबोप्लास्टी सारखी कोणतीही शस्त्रक्रिया न करता पंचकर्मातील योग बस्ती व्दारे व उत्तर बस्ती या थेट गर्भाशयात खोलवर जावून केल्या जाणाऱ्या उपचारांव्दारे यशस्वी उपचार केले जातात.
Endometrial Insufficiency गर्भाशयाचा अंतःस्तर अतिशय पातळ असणे:
वारंवार केल्या जाणाऱ्या क्युरेटीनमुळे, गर्भपातांमुळे, टीबीमुळे गर्भाशयाचा गर्भधारणेच्या व गर्भाचे पोषण होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा Endometrium नावाचा अंतस्तर खरवडला जातो, पातळ होत जातो. गर्भ न राहाण्यास हे एक गंभीर कारण ठरते. बस्ती व उत्तरबस्तीचा येथे परिणामकारक उपयोग होतो.
Unexplained Infertility:
दृष्य स्वरूपात पती पत्नीचे सर्व रिपोर्टस् नॉर्मल असतांना, समोर स्थूलमानाने कोणत्याही स्वरूपात दोष दिसत नसतांनाही अनेक वर्षे गर्भधारणा न होणे. या ठिकाणी पंचकर्माव्दारे पती पत्नीच्या शरीराची सुक्ष्म स्वरूपात शुध्दी करून नंतर सलग दिलेल्या अभ्यंतर औषधांनी यशस्वी उपचार करतो.
To know more about us, https://www.drmulay.com
for appointment, call us at 93090 39395
Find us on google, https://goo.gl/maps/Mz5QrneqwrdUH9GD7
#dranshumulay #infertility #infertilitytreatment #marathi #ahmednagar #menarche #menstrualpain #menstrualproblems
Информация по комментариям в разработке