एसटी बसने 🚌 केला प्रवास थेट "स्वर्गात"|राजधानी रायगड किल्ला|Raigad Fort in Monsoon 🌧️|Full Details

Описание к видео एसटी बसने 🚌 केला प्रवास थेट "स्वर्गात"|राजधानी रायगड किल्ला|Raigad Fort in Monsoon 🌧️|Full Details

एसटी बसने 🚌 केला प्रवास थेट "स्वर्गात"|राजधानी रायगड किल्ला|Raigad Fort in Monsoon 🌴 🌧️|Full Details Video

Content Covered:-

Raigad Killa Fort
Raigad Fort full details video
Raigad fort new vlog video monsoon
Raigad vlog video 2024
Bhushan the explorer vlog videos raigad fort
Raigad fort konkan vlog 2024

#raigad#fort#video#2024
#bhushan#the#explorer#raigad#killavideo
#raigad#mahad#fort
#raigad#fort#information#video#2024

किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे.

ह्याचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते.शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राज सभेत ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला.

******************************************************

Chhtrapati Shivaji Maharaj the Maratha ruler, along with the his chief engineer Hiroji Indulkar, oversaw the construction and development of various buildings and structures within Raigad. In 1674, after being crowned the king of the Maratha Kingdom of the Konkan, Shivaji chose Raigad as his capital.[2]
Located at an elevation of 820 metres (2,700 ft) (2,700 ft) above its base and 1,356 m (4,449 ft) (4,449 ft) above sea level within the Sahyadri mountain range, the fort offers views of the surrounding area. Accessing the fort requires ascending approximately 1,737 steps. Alternatively, visitors can opt for the Raigad Ropeway, an aerial tramway spanning 750 m (2,460 ft) (2,460 ft) in length and reaching a height of 400 m (1,300 ft) (1,300 ft), which conveniently transports them from the ground to the fort in just four minutes.
The main palace was constructed using wood, of which only the base pillars remain. The main fort ruins consist of the queen's quarters, and six chambers, with each chamber having its private restroom. The chambers do not have any windows. In addition, ruins of three watch towers can be seen directly in front of the palace grounds out of which only two remain as the third one was destroyed during a bombardment. The fort also overlooks an artificial lake known as the Ganga Sagar Lake.[
The only main pathway to the fort passes through the "Maha Darwaja" (Huge Door) which was previously closed at sunset. The Maha Darwaja has two huge bastions on both sides of the door which are approximately 20–21 m (65–70 ft) in height. The top of the fort is 180 m (600 ft) above this door.

Комментарии

Информация по комментариям в разработке