गहू लागवड कशी करावी रब्बी हंगामातील गहू व्यवस्थापन गहू पिकासाठी चांगल्या निच-याची भारी आणि खोल जमिनीची निवड करा. #गहू_लागवड
पेरणीची वेळ – जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. त्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करून जमीन तयार ठेवावी.
हवामान : गहू पिकास थंड व कोरडे हवामान चांगले मानवते. उष्ण व दमट हवामान या पिकास अपायकारक ठरेते. बी उगवण्याच्या काळात १५ - २० डी.से., कायिक वाढीच्या अवस्थेत ८ - १० डी.से. आणि पीक तयार होण्याच्या अवस्थेत २० - २५ डी. से. तापमान आवश्यक असते. सरासरी ७ - २१ डी. से. तापमानात गव्हाची वाढ चांगली होते. जास्त तापमानमुळे फुटवे कमी येतात. तसेच उगवण झाल्यानंतर हवा उष्ण व ढगाळ असेल तर रोपांची मुळकुजव्या रोगामुळे हानी होते.
.*DOWNLOAD APP --- https://play.google.com/store/apps/de...
WHATSAPP https://wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE https://agrowone.in/
📞📞 https://wa.me/919172800247
जमिनीची निवड : पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी, खोल जमीन निवडावी. साधारणपणे गाळयुक्त पोयट्याच्या जमिनी गव्हासाठी जास्त योग्य असतात. पिकास जास्त दलदलीची व वरकस जमीन निवडू नये. जिरायत गव्हासाठी ओलावा टिकवून ठेवणारी भारी जमीन निवडावी. चिकणयुक्त कणांचे प्रमाण ६०% पर्यंत व उपलब्ध सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ६३% असलेल्या भारी जमिनीत अधिक उत्पादन मिळते. तसेच खरीप हंगामात ज्या जमिनीत द्विदलवर्गीय (कडधान्य) पीक घेतले होते, अशी जमीन गव्हासाठी निवडावी. कारण या पिकाचा बेवड गव्हास मिळतो.
पूर्व मशागत : या पिकाच्या मुळ्या जमिनीत ६० - ६५ सें. मी. पर्यंत खोलवर जात असल्यामुळे या पिकास जमीन चांगली भुसभुशीत लागते. त्यासाठी २० से. मी. खोल नांगरत करावी. त्यानंतर २ - ३ कुळवाच्या उभ्या - आडव्या पाळ्या धाव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी वाळलेली तणे, कास्या, पिकांची धसकटे वेचून जमीन स्वच्छ करावी. तसेच एकरी १० - १२ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीवर विस्कटावे त्यानंतर कुळवाची शेवटची पाळी देऊन शेणखत जमिनीत चांगले मिसळावे.
३) जिरायत गहू पेरणीसाठी बियाणे ७५ ते १०० किलो वापरावे. कमीत कमी तीन वर्षातून एकदा बियाणे बदलणे आवश्यक ठरते. मात्र पहुर, ता. जामनेर, जि. जळगाव येथील श्री. दिलीप देशमुख हे गेले २० वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने त्यांच्याच शेतात उत्पादित केलेले २१८९ गव्हाचे बियाणे वापरून दर्जेदार उत्पादन घेत आहेत. (संदर्भ- कृषी मार्गदर्शिका २०१२, पान नं. ८०)
बीज प्रक्रिया :
१) पेरणीपूर्वी ४० किलो बियाण्यास ५०० मिली जर्मिनेटर + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंटचे ३ ते ५ लि. पाण्यात द्रावण तयार करून त्यामध्ये बियाणे पूर्णपणे घोळून घ्यावे. म्हणजे सर्व बियाण्यास प्रक्रिया झाली पाहिजे. या प्रक्रियेमुळे बियाण्याची उगवण कमी दिवसात एकसारखी व जास्तीत जास्त होऊन कायणी व बुंधाकूज या रोगांचे काही प्रमाणात नियंत्रणही होते, तसेच हवेतील नत्र जमिनीत स्थिर होण्यास मदत होते परिणामी उत्पादनात वाढ होते.
सुधारित वाण :
१) एच. डी. २१८९ : पक्वता कालावधी १२० दिवस, उत्पादन ३५ - ४० क्विंटल / हे., दाणे मोठे, पिवळसर व तेजदार, सरबती बाण, काळ्या व नारंगी तांबेच्यास प्रतिकारक.
२) एम. ए. सी. एस. २८४६ : पक्वता कालावधी १२० दिवस, उत्पादन ४० - ४५ क्विंटल/ हे. भरपूर उत्पादन क्षमता असणारा सरबती वाण, भरपूर फुटवे, तांबेच्यास काही प्रमाणात बळी पडतो.
३) एम. ए. सी. एस. - २४९६ : पक्वता कालावधी १२० दिवस, उत्पादन ४० ते ४५ क्विंटल / हे., भरपूर उत्पादन क्षमता असणारा सरबती वाण, भरपूर फुटवे येतात. तांबेऱ्यास काही प्रमाणात बळी पडतो.
४) डी. डब्ल्यू. आर. - १६२ : पक्वता कालावधी १२० दिवस, उत्पादन ४० - ४५ क्विंटल / हे भरपूर उत्पादन देणारा सरबती वाण.
५) एन. आय. ए. डब्ल्यू (त्र्यंबक )- ३०१ : पक्वता कालावधी ११५ दिवस, उत्पादन ४५ क्विंटल / हे. भरपूर उत्पादन क्षमता असणारा सरबती वाण, चपातीस, उत्तम, दाणे जाड व तेजदार, तांबेरा रोगास प्रतिकारक.
ब) बागायती गहू - उशिरा पेरणीसाठी:
१) एच. आय. - ९७७ : पक्वता कालावधी १०५ दिवस, उत्पादन ३० - ३५ क्विंटल / हे., मध्यम उंची, दाणे मोठे व पिवळसर, तांबेरा रोगास प्रतिकारक वाण.
२) एच. डी.- २५०१ : पक्वता कालावधी ११० दिवस, उत्पादन ३५ -४० क्विंटल/ हे., मध्यम वाढ, भरदार ओंबी, पिवळसर व तेजदार दाणे.
३) एन. आय. ए. डब्ल्यू - ३४ : पक्वता कालावधी १०० दिवस, उत्पादन ४० -४२ क्विंटल/ हे., भरपूर उत्पादन, चपातीस योग्य, भरपूर फुटवे, मध्यम उंचीचा, तांबेरा प्रतिकारक, सर्व हंगामासाठी योग्य वाण.
क) जिरायातीसाठी वाण:
१) एन - ५९ : पक्वता कालावधी ११० दिवस, उत्पादन - ८ १० क्विंटल/ हे., उंच वाढणारा, ओंबी भरदार, दाणे जाड, पिवळसर व तेजदार, तांबेर्यास बळी पडतो.
२) एन. - ५४३९: पक्वता कालावधी ११५ दिवस, उत्पादन १० - १२ क्विंटल/ हे., सरबती वाण चपातीस उत्तम, तांबेर्यास बळी पडतो. कापणी वेळेवर करावी लागते.
३) एन. - ८२३३ : पक्वता कालावधी १२० दिवस, उत्पादन १२ -१५ क्विंटल/ हे., दाणे मध्यम पिवळसर व तेजदार, सरबती वाण, पाणी दिल्यास भरपूर उत्पादन.
४) एन. आय. डी. डब्ल्यू - १५ (पंचवटी) : पक्वता कालावधी १२० दिवस, उत्पादन १२ - १५ क्विंटल/ हे. , अधिक उत्पादन देणारा बंशी वाण, दाणे जाड व तेजदार, शेवया व कुरवड्यासाठी उत्तम, तांबेर्यास प्रतिकारक.
पेरणीची पद्धत, पेरणीचे अंतर व खोली : गव्हाची पेरणी पाभरीने करावी. दोन ओळीतील अंतर (फणातील) पुढीलप्रमाणे ठेवावे.
१) बागायत गहू - वेळेवर पेरणीसाठी २२.५ सें.मी.
२) बागायत गहू - उशिरा पेरणीसाठी १८ सें.मी.
३) जिरायत गव्हासाठी -२२.५ - ३० सें. मी. #agrowone,#agrowonemarathi,
Информация по комментариям в разработке