Vengurla Beaches - Cinematic scenes & Relaxing Ocean Sounds वेंगुर्ला समुद्र - पहा आणि ऐका! कोकण

Описание к видео Vengurla Beaches - Cinematic scenes & Relaxing Ocean Sounds वेंगुर्ला समुद्र - पहा आणि ऐका! कोकण

रविवारचा दिवस आहे आणि कोविडच्या कोपामुळे तुम्ही घरी सहकुटुंब अडकलेले आहात, उन्हाळ्याची सुट्टी अशीच गेली. आंबे खाताना कोकणात भ्रमंती कधी करायला मिळणार हा विचार नक्की मनात डोकावला असेल. तेव्हा हा व्हिडीओ मस्त मोठ्या स्क्रीनवर पहा आणि तुमची साउंड सिस्टीमही ऑन करा. मोबाईल फोनवर पाहत असाल तर तुमचे हायफाय हेडफोन लावायला
Vengurla beaches This video covers 17 beaches in Vengurla Taluka from Redi to Bhogawe. Shiroda, Aravali, Kadoba, Mochemad, Sagareshwar, Vengurla, Dabholi - Wayangani, Konudra, Falayefond, Kalavi, Kelus Mobar, Khavne, Dandeshwar Shriramwadi, Nivati .. each one of them has unique beauty and offers heavenly experience. Darya Firasti is our attempt to capture the untouched vistas of the Konkan coast using cinematic treatment. Vengurla Beaches - Cinematic scenes & Relaxing Ocean Sounds वेंगुर्ला समुद्र - पहा आणि ऐका! कोकण

विसरू नका. कारण कोकणातील दर्या फिरस्ती ही फक्त पाह्ण्याचीच नव्हे तर ऐकण्याचीही गोष्ट आहे. वेंगुर्ला तालुका म्हणजे महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे दक्षिण टोक. जगभरात समुद्रकिनाऱ्यांसाठी जरी गोमंतक प्रसिद्ध असला तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरतीरांची भ्रमंती हा एक आगळा अद्वितीय अनुभव असतो. रेवस ते तेरेखोल या सातशे किलोमीटर लांब प्रवासातील तेरेखोल ते भोगवे हा टप्पा.. वेंगुर्ला तालुक्यातील सगळे १७ समुद्रकिनारे आपण या व्हिडिओत अनुभवणार आहोत. व्हिडीओ शूट करत असताना ड्रोन अन अत्याधुनिक कॅमेरा तर वापरले आहेतच.. शिवाय सागराशी संवाद साधता यावा यासाठी खास साऊंड डिझाईन केलं आहे मित्रवर्य आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रतिभावंत नामांकित ध्वनि तज्ज्ञ मंदार कमलापूरकर.. हा व्हिडीओ नक्की पहा.. आवडला तर तुमच्या कोकणवेड्या मित्र, नातेवाईक, सहकारी सर्वांसोबत शेअर करा आणि तुमचा अभिप्रायही नक्की कळवा

00:00 - Intro montage
00:57 - Terekhol
01:55 - Redi
02:18 - Shiroda
03:25 - Sagarteertha
03:58 - Kadoba
04:20 - Mochemad
05:23 - Sagareshwar
06:47 - Vengurla
07:27 - Dabholi Wayangani
08:06 - Kondura
09:21 - Falayefondwadi
10:12 - Kelus Mobar
10:42 - Khavne
11:19 - Dandeshwar Shriramwadi
11:57 - Nivati
13:03 - Bhogawe

रेडी ते भोगवे या टप्प्यातील १७ रमणीय सागरतीरांना अनुभवण्यासाठी हा व्हिडीओ बनवला आहे. सिनेमॅटिक चित्रण केलेली दृश्ये आणि ध्वनी संयोजन तुम्हाला तिथं प्रत्यक्ष असण्याचा अनुभव देईल हे नक्की. रेडी, शिरोडा, आरवली, कडोबा, मोचेमाड, सागरेश्वर, वेंगुर्ला, दाभोली-वायंगणी, कोंडुरा, फळयेफोंडवाडी, कालावी, केळूस मोबार, खवणे, दांडेश्वर-श्रीरामवाडी, निवती आणि भोगवे... प्रत्येक ठिकाणी समुद्राचा अनुभव वेगळा.. देखावा वेगळा.. आवाज वेगळा.. हे सगळं सौंदर्य सिनेमॅटिक दृष्टीने उत्तम ध्वनी संयोजनासह तुमच्यापर्यंत आणण्याचा हा प्रयत्न आहे.

Written, videographed and edited by Chinmaye Aniruddha Bhave
Voiceover - Purudatt Ratnakar
Sound Design - Mandar Kamalapurkar
Music- Soar by Scott Buckley – www.scottbuckley.com.au
made available under the Creative Commons ‘Attribution 4.0 International’ (CC BY 4.0) License

लेखन, चित्रण, संकलन - चिन्मय अनिरुद्ध भावे
दर्या फिरस्ती प्रकल्प
निवेदन - पुरुदत्त रत्नाकर
ध्वनी संयोजन - मंदार कमलापूरकर, सचिदानंद टिकम
संगीत - सोअर, स्कॉट बकली ऑस्ट्रेलिया
क्रिएटिव्ह कॉमन्स 4.0 द्वारे उपलब्ध

Equipment

Canon EOS 80D
Canon 5D mk III
DJI Osmo Pocket Cinema
DJI Mavic Air drone
Go Pro Hero 8 Black
Zoom H4N
Imac 27 inch

Mobility solution
Tata Nano Twist 2015 XTA

Комментарии

Информация по комментариям в разработке