झटपट कुकरमध्ये बटाट्याचा मसाले भात । चटपटीत खमंग वाटली डाळ | Vatli Dal Recipe । Masale Bhat Recipe

Описание к видео झटपट कुकरमध्ये बटाट्याचा मसाले भात । चटपटीत खमंग वाटली डाळ | Vatli Dal Recipe । Masale Bhat Recipe

Masale Bhat । बटाट्याचा मसाले भात । Vatli Dal । चटपटीत वाटली डाळ । झटपट आणि सोप्पी रेसिपी | पारंपारिक पदार्थ । सणवार स्पेशल । Traditional and Healthy 😋

#masalebhatrecipe #masalebhatrecipeinmarathi #vatlidal #moklidal #navratrispecial #indianfood #indianrecipes #maharashtrianarecipes #directcookerrecipes #anuradhasrecipe #anuradhaschannel

सणवार असो वा पाहुणे मंडळी घरी येणार असोत काही पदार्थ आपण नेहमी करत असतो, मग आज आपण पाहुयात झटपट होणाऱ्या आणि मुख्य म्हणजे सर्वांना आवडणाऱ्या दोन चविष्ट रेसिपीज -

वाटली डाळ:
१ वाटी हरभरा डाळ २ ते ४ तास पाण्यात भिजवून घेणे. त्यात २ मिरच्या,आलं चा तुकडा आणि थोडं पाणी घालून मिक्सर मध्ये वाटून घेणे. आता कढई मध्ये एरवी पेक्षा थोडंसं जास्त तेल घेणे व मोहरी, जिरे, कडीपत्ता आणि हिंग घालून फोडणी करून घ्यावी. मिक्सर मध्ये वाटून घेतलेली डाळ त्यात घालावी व वाफवून घ्यावी. डाळ छान वाफवून झाली की त्यात हळद, चावी पुरते मीठ, थोडी साखर आणि लाल तिखट घालून छान परतून मग झाकण ठेऊन वाफवून घ्यावे. झाली आपली डाळ तय्यार! ती गार झाली की मोकळी होते, त्यात कोथिंबीर घालून मस्त पैकी सजवणे!

बटाट्याचा मसाले भात:
२ वाट्या तांदूळ २ वेळा नीट धुऊन घ्यावे, आणि २ बटाटे साल काढून त्याचे साधारण छोटे छोटे काप चौकोनी आकारात चिरून घ्यावे. थेट कुकर गॅस वर ठेऊन त्यात २ चमचे तेल घ्यावे. तेल गरम झाले की त्यात मोहरी, जिरे आणि बटाटे टाकून नीट परतून घ्यावे. त्यात आता खडा मसाला - २ तमालपत्र, छोटा दालचिनीचा तुकडा, ३ लवंगा, २ वेलदोडे छान परतून घेणे. दुसरीकडे २ वाटी तांदूळ साठी ४ वाटी पाणी उकळून घ्यावे. त्यात थोडासा कडीपत्ता, हळद, आणि तांदूळ घालून छान हलवून घ्यावे. त्यात चिमूटभर दालचिनी पूड, १ चमचा धणेपूड आणि २ चिमूट वेलदोड्याची पूड घालून छान हलवून घ्यावे. त्यात आता २ चमचे काळा मसाला, १ चमचा तिखट व चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर आणि चवीपुरती साखर घालून त्यात ४ वाटी उकळलेलं पाणी घालावे. पाण्याला छान उकळी आली की झाकण लावून घ्यावे. कुकर च्या २ शिट्या झाल्या की गॅस बंद करावा. झाला आपला मस्त गरम गरम बटाट्याचा मसाले भात तय्यार!

कशा वाटल्या तुम्हाला ह्या झटपट, सोप्या आणि रुचकर रेसिपीज ? करून बघा आणि आम्हाला नक्की सांगा, आणि हो अनुराधा रेसिपीज चॅनलला फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!!


how to make masale bhat in direct cooker?,
vatli dal recipe in Marathi
masale bhat recipe in Marathi
Simple masale bhat recipe

---------------------------------------------------------------------------------------------------------

सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

Subscribe to Anuradha's Channel -    / @anuradhaschannel  
Instagram Channel-   / anuradhaschannel  
Facebook Channel -   / anuradha.tambolkar  
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा 👇
1) बेसनचा शिरा ।बेसन का हलवा ।खाताच विरघळणारा झटपट होणारा शिरा | Instant Besan Shira Recipe in Marathi :-    • बेसनचा शिरा ।बेसन का हलवा ।खाताच विरघ...  

2) न्याहारीसाठी खास मक्याच्या कणसाचा किस आणि नारळाच्या दुधातील मक्याचे कणीस- Chaturmas Special Recipes :-    • न्याहारीसाठी खास मक्याच्या कणसाचा किस...  

3) घरात फ्लॉवर-मटार आहे? मग करा ही रेसिपी | No Onion Garlic | Chaturmas Special Breakfast Pohe Recipe :-    • घरात फ्लॉवर-मटार आहे? मग करा ही रेसिप...  

Комментарии

Информация по комментариям в разработке