Gopichand Padalkar, Pravin Darekar ते Ravi Rana चर्चेत असलेल्या या 10 आमदारांचं मंत्रीपद कसं हुकलं ?

Описание к видео Gopichand Padalkar, Pravin Darekar ते Ravi Rana चर्चेत असलेल्या या 10 आमदारांचं मंत्रीपद कसं हुकलं ?

#BolBhidu #Mahayuti #MahayutiCabinetExpansion

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 22 दिवसांनी रविवारी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. नागपूरच्या राजभवनात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश होता. जर पक्षांनुसार या मंत्रिमंडळाचा विस्तार बघितला तर भाजपला 19, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 11 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाला 9 मंत्रिपद मिळाली आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार बघितला असता २० नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय तर १२ एकनाथ शिंदेंच्या मंत्रीमंडळातील नेत्यांना डावलण्यात आलंय. याबद्दल मंत्रिमंडळ विस्तारानंतर जी पत्रकार परिषद झाली, त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार करताना आम्ही सर्व प्रकारचे चेहरे यात दिसले पाहिजे याचा विचार केलाय. त्यादृष्टीने मंत्रिमंडळात काही जुने-जाणते नेते आहेत, काही नवी चेहरे आहेत. महिलांना मंत्रिमंडळात योग्य संधी दिलीय तसंच विविध समाजांना देखील स्थान देण्यात आलय.

हे सर्वसमावेशक मंत्रिमंडळ आहे. आता काही जणांना यात संधी दिली नाही, त्यामागे वेगवेगळी कारणं आहेत. काहींना पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्यामुळे मंत्रिपद दिलं नाही, तर काही जणांना त्यांच्या मागच्या वेळच्या मंत्रिपद कार्यकाळात काम न केल्यामुळे मंत्रिपद दिलं गेलेलं नाही. असं फडणवीसांनी सांगितलं. पण असे कोणते चर्चेतले आमदार ज्यांच्या नावाच्या चर्चा झाल्या पण मंत्रिपद काही मिळालं नाही? आणि कोणाला डावलण्यात आलं? पाहुयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке