कानडा राजा पंढरीचा मर्मबंधातली ठेव प्रथमेश लघाटे संवादक पार्थ बावस्कर

Описание к видео कानडा राजा पंढरीचा मर्मबंधातली ठेव प्रथमेश लघाटे संवादक पार्थ बावस्कर

#prathameshlaghatekanadaraja
#kanadaraja
#Diwalipahat2021

विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था औरंगाबाद आयोजित विद्यार्थयांच्या आर्थिक मद्तीसाठी अभिजात संगीताचा सुरेल नजराणा मर्मबंधातली ठेव ... दि १२ ऑगस्ट २०१८

गीत - ग. दि. माडगूळकर

संगीत - सुधीर फडके

स्वर - प्रथमेश लघाटे

चित्रपट - झाला महार पंढरीनाथ (१९७०)



कानडा राजा पंढरीचा

वेदांनाही नाही कळला

अंतःपार याचा



निराकार तो निर्गुण ईश्वर

कसा प्रकटला असा विटेवर

उभय ठेविले हात कटिवर

पुतळा चैतन्याचा



परब्रम्ह हे भक्तांसाठी

मुके ठाकले भीमेकाठी

उभा राहिला भाव सावयव

जणु की पुंडलिकाचा



हा नाम्याची खीर चाखतो

चोखोबांची गुरे रखतो

पुरंदराचा हा परमात्मा

वाली दामाजीचा

विठोबा, विठू, विठ्ठल, पांडुरंग,विठूराया वा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या राज्यात वंदिली जाते. विठोबा हा श्रीहरी चा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठ्लाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे. गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू पडते.. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेऊन, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्‍नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते.
विठोबा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रात कर्नाटक सीमेजवळ पंढरपूर येथे आहे. जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहित नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे ह्याचे पुरावे आढळतात. पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. त्यातील आषाढी एकादशीला भरणार्‍या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात. या नदीला येथे 'चंद्रभागा' म्हणतात. विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत होय.[१]
संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३ ते १७ व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. कन्‍नड कवींनी कानडी श्लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचिले आहे. विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी आहेत.


#prathameshlaghate
#kanadaraja
#letestprathamseshlaghate

Комментарии

Информация по комментариям в разработке