सद्गुरु येतील रे धावुनी | Gondavalekar Maharaj | श्री गोंदवलेकर महाराज भजन

Описание к видео सद्गुरु येतील रे धावुनी | Gondavalekar Maharaj | श्री गोंदवलेकर महाराज भजन

Please Like, comments & subscribe the channel
रचना - श्री विनायक ताडे (बालमती)
संगीत व गायन - आनंद देशपांडे

Rachana - Shri. Vinayak Tade (Balmati)
Music - Anand Deshpande
Singer - Anand Deshpande
Video By - SHREE Film & Photography, Aurangabad
Video Created By Bhushan Deshpande

नकाच शोधू तुम्ही सद्गुरु ।
येतील ते धावुनी ।
अंतरातल्या अनुसंधानी ।
नाम ज्योती पाहुनी ।।
सद्गुरु येतील ते धावुनी ।।धृ ।।

नामासाठी घ्यावे नामा ।
सद्भक्तीचा हा ओ नामा ।
नाम तारुनी नेईल नौका ।
परमात्मा चरणी ।
सद्गुरु येतील ते धावुनी ।।१।।

नाम स्वयंभू तेज प्रभूंचे ।
कुणीही गावे नाम विभुंचे ।
आदित्याची प्रभा न बघती ।
कोणा विनवुनी ।
सद्गुरु येतील ते धावुनी ।।२।।

तेच राहते नाम सदैवी ।
कृपा लाभ सद्गुरूंचा दैवी ।
शोधीत शोधीत सतशिष्यांना ।
फिरतो या भूवरी ।
सद्गुरु येतील ते धावुनी ।।३।।

नाम वेध सद्गुरु योग्यांना ।
शर्करा जशी त्या मुंग्यांना ।
नाम प्रीतीचा छंद खेचतो ।
सद्गुरु आपणहुनी ।
सद्गुरु येतील ते धावुनी ।।४।।

Enjoy & stay connected with us!!

"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"

Follow me on Instagram -   / anand_deshpande10  
Facebook page - https://www.facebook.com/profile.php?...

I hope you enjoyed this video

Комментарии

Информация по комментариям в разработке