शेती योजना 2023 | कृषि योजना 2023 | shetkari yojana 2023 maharashtra

Описание к видео शेती योजना 2023 | कृषि योजना 2023 | shetkari yojana 2023 maharashtra

▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!

👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/

============================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱शेती योजना 2023 | कृषि योजना 2023 | shetkari yojana 2023 maharashtra👍

1. सलोखा योजना - जमिनीचा ताबा आणि वही-वाटी बाबत अनेकदा शेतकऱ्यांमध्ये आपापसात वाद असतात आता हे वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सलोखा योजना आणली. योजनेत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा दुसऱ्याकडे असल्यास आणि दुसरे शेतकऱ्यांच्या नावावरील शेतजमीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असल्यास अशा शेतजमीनधारकांच्या अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्क मध्ये सवलत देणार आहे. दस्त नोंदणीच्या आदलाबदला साठी मुद्रांक शुल्क 1000 रुपये आणि नोंदणी 100 रुपये असणार आहे. योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल तसेच विविध न्यायालयातील प्रकरण निकाली निघतील भूमाप यांचा अनावश्यक हस्तक्षेप सुद्धा होणार नाही.
👉अर्ज करण्याची प्रक्रिया - तलाठी किंवा मंडळ अधिकारी कृषी विभाग

2. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - शेतामध्ये ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन संच बसवण्यासाठी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान -
1) अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी – ५५ %
2) इतर शेतकरी – ४५ %
👉पात्रता -
शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल.
सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.
शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म-सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात.
👉अर्ज करण्याची प्रक्रिया - https://mahadbt.maharashtra.gov.in/

3. सधन कुक्कुटपालन योजना - महाराष्ट्र शासनाद्वारे हि योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे राज्यातील ग्रामीण भागात लघु उद्योग उभा करून ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ सामान्य शेतकऱ्यांना होणार आहे जेणेकरून त्यांना शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय करू शकणार आहेत.
👉पात्रता -
एखादा व्यक्ती आधीपासून शेळी पालन मत्स्य पालन हे व्यवसाय करत असेल त्यालाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
कुक्कुटपालन करण्यासाठी व्यक्तीकडे स्वतःच्या जमिनीची मालकी कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
ज्या शेतकऱ्याने आधीच कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यालाही व्यवसाय वाढवण्यासाठी या योजनेमध्ये अर्ज करता येईल.
👉अर्ज करण्याची प्रक्रिया - जिल्हा पशुसंवर्धन विभाग तसेच तालुका पशुसंवर्धन विभाग किंवा पंचायत समिती या ठिकाणी संपर्क करावा.

4. अहिल्या शेळीपालन योजना - या योजनेद्वारे शेतकऱ्यांना किंवा लाभार्थ्याला 10 शेळ्या व 1 बोकड असा शेळी गट वाटप करण्यात येतो जेणेकरून शेतीपूरक व्यवसायासाठी त्याला लाभार्थ्याला मदत मिळेल. लाभार्थीसाठी ९०% शासन हिस्सा (रु ५९,४००/-) व १०% लाभार्थी हिस्सा (रु,६६००/-) याप्रकारे लाभ मिळणार.
👉पात्रता -
योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच घेता येईल.
पारंपरिक शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
शेळीपालनाचा अनुभव असावा. स्वतःची जमीन असणे आवश्यक
अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र देणे बंधनकारक
👉अर्ज करण्याची प्रक्रिया - www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही या योजनेविषयी अधिक ची माहिती घेऊ शकतात.

5. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना - सौर पंप योजनेंतर्गत राज्य सरकार पंप किंमतीच्या ९५ टक्के अनुदान देते. लाभार्थीद्वारे केवळ ५ टक्के रक्कम खर्च केली जाईल. नैसर्गिक इंधनाची म्हणजेच पेट्रोल, डिझेल ची बचत होणार आहे आणि त्यांचा इंधनाला लागणार खर्चहि वाचेल.
👉पात्रता -
लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे पारंपारिक वीज कनेक्शन असू नये.
पाण्याचे निश्चित स्रोत असलेले शेतजमीन असावी.
यापूर्वी कोणत्याही योजनेतून विद्युतीकरण झाले नसलेले शेतकरी.
५ एकरांपर्यंत शेतजमीन असणारी ३ एचपी पंप पात्र आहे आणि ५ एकरांपेक्षा जास्त शेती जमीन ५ एचपी आणि ७.५ एचपी पंपसाठी पात्र आहे.
दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना अधिक प्राधान्य.
वनविभागातील एनओसीमुळे अद्याप वीज नसलेल्या खेड्यांमधील शेतकरी.
👉अर्ज करण्याची प्रक्रिया - या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन https://www.mahadiscom.in/solar/index... या वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal #yojna

Комментарии

Информация по комментариям в разработке