मंगळागौरीचे खेळ | Mangalagaur khel

Описание к видео मंगळागौरीचे खेळ | Mangalagaur khel

मंगळागौरीचे खेळ - मिळवले मंगळागौरीच्या स्पर्धेत बक्षिस.. मंगळागौरी Dance 2024 #sharavn#mangalagauri

Hirakani group , pahile bakshis , mangalagauri che khel

या वर्षी आम्हीं पहिल्यांदाच मंगळागौरी च्या स्पर्धेत भाग घेतला होता , 15 दिवस continuously practice केली आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं.

मंगळागौरीचे खेळ खूपच प्रसिद्ध आहेत. हल्ली तर खास मंगळागौरीच्या खेळांचे कार्यक्रमही आयोजित करण्यता येतात. यामध्ये फुगडी हा प्रकार खूपच प्रसिद्ध आहे. त्याशिवाय झिम्मा आणि इतर खेळही गाण्यांसह खूपच मजेशीर असतात. यामध्ये साधारण 110 खेळांचा समावेश आहे. या सर्व खेळांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो. पूर्वीच्या काळी सतत घरकामात असणाऱ्या महिलांना या मंगळागौरीच्या निमित्ताने आपल्या मैत्रिणींशी खेळण्याच आनंद घेता यायचा. हे खेळ खेळताना महिला गाणी म्हणत आनंद घेत असत. मंगळागौरीचे हे व्रत कष्टाचे आणि दमायचे नसून चपलता देणारे, चैतन्य आणणारे आणि एकजुटीचा आनंद देणारे आहे असे म्हटले जाते. यामध्ये बस फुगडी, वटवाघूळ फुगडी, फिंगरी फुगडी, तवा फुगडी, आगोटापागोटा, गाठोडे, लाटा बाई लाटा, करवंटी झिम्मा, सासू – सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, साळुंकी असे अनेक खेळ खेळवण्यात येतात. साधारणतः 21 प्रकारच्या फुगड्या आणि 6 प्रकारचे आगोटेपागोटे यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे मंगळागौरीच्या पूजेला महिलांना नेहमीच मजा येते. यावेळी खास मराठी उखाणेही घेतात. आपल्या नवऱ्याचे नाव उखाण्यातून घेण्याची मजाच काही वेगळी आहे.



#pune​
#mangalagauri​
#मंगळागौर​
#सण​
#maharashtra​
#श्रावण​
#श्रावण_सोमवार​
#shravan​
#स्त्री​
#women​

Комментарии

Информация по комментариям в разработке