सातबाऱ्यामध्ये बदल कोणकोणत्या कारणांमुळे होतो | Satbara Changes

Описание к видео सातबाऱ्यामध्ये बदल कोणकोणत्या कारणांमुळे होतो | Satbara Changes

#SatbaraUtara #RevenueDepartment #landRecordsMaharashtra

सातबाऱ्यामध्ये बदल कोणकोणत्या कारणांमुळे होतो ?

सातबारा हा दरवर्षी काढला पाहिजे कारण यात बदल जो होतो तो २ / ३ कारणांमुळे होतो. एक होतो तो पिकांच्यामुळे होतो ( म्हणजे खरिपामध्ये एकदा पीक पाहणी होते आणि रग्बी मध्ये एकदा पीक पाहणी होते त्यामुळे सातबारांमधला पिकांमधील बदल जो आहे तो दोन वेळा होतॊ. आणि मधल्याकाळामध्ये जर वारस नोंद झाली जमिनीची खरेदी विक्री झाली तर त्यामुळे सातबारा मध्ये बदल होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा सातबार्यात बदल होईल तेव्हा तेव्हा नवीन सातबारा काढला पाहिजे. सातबारा मध्ये जेव्हा आपल्याला बदल घडवायचा असतो आपल्याला त्यावेळी ज्याने हक्क मिळवला वारसाचा अर्ज - आहे अशा व्यक्तीने असा हक्क मिळाल्या पासून तीन महिन्यानच्या आत अशी माहिती तलाठ्याला देणे अपेक्षित आहे. ( मग ती वारसाची असो किंवा एकदा खातेदार मयत झाला तर त्याचा मृत्यूचा दाखल व बरोबर वंशवेल लिहून एक प्रतिज्ञा पत्र आपण सादर करतो आणि त्याद्वारे सांगतो कि सातबाऱ्यावर नाव असलेली हि व्यक्ती मयत झाली आहे. आम्ही त्यांची ४ मुले आहेतो. अशा पद्धतीचा वारस हक्क मागणारा अर्ज त्याला वारसाचा अर्ज असे आपण म्हणतो. असा अर्ज आपण तलाठ्याला देतो त्याच्यानंतर अर्जाच्या आधारे फेरफार नोंद होते. नंतर सातबारा मध्ये तशाप्रकारचा बदल होतो.

खरेदी खत - त्याच पद्धतीने खरेदी खत केले तर खरेदी खताची ची प्रत जोडून तलाठ्याला अर्ज दिला पाहिजे आम्ही या या तारखेला जमीन खरेदी केली आणि ती अमुक अमुक गट नंबर मधील अमुक क्षेत्राची जमीन आहे आणि त्याची मी केलेल्या खरेदीखताची प्रत सोबत जोडली आहे. त्याप्रमाणे सातबारामध्ये योग्य तो बदल करावा अशा पद्धतीने तलाठ्याकडे अर्ज केला पाहिजे.

सातबारा नव्याने आणि कसा लिहतात.
सर्वे साधारण पणे तलाठ्याकडे हाताने लिहलेला सातबारा जो आहे हा दार १० वर्षाने नवीन लिहला जातो. कारण ते पुस्तक जे बाइंड केलेले असते त्यात १० वर्षाचीच पीक पाहणी त्याच्यामध्ये सामाविस्ट होऊ शकते. नाहीतर सातबाराचा फॉर्म पूर्ण भरतो म्हणून दर १० वर्षांनी वार्षिक सातबारा पुनर्लेखन कार्यक्रम असे त्याला नाव दिले आहे . दर १० वर्षांनी सातबारा पुन्हा नव्याने लिहला जातो. आणि असा नव्याने लिहिताना जुन्या ज्या नोंदी आहेत. जे लोक मयत झालेले आहेत ज्यांची नवे कंस होऊन कमी झालेली आहेत अशी सगळी नावे कमी होतात. आणि फक्त जेवढ्या जिवंत नोंदी आहेत तेवढ्या नोंदी ठेवून हा सातबारा नव्याने लिहला जातो.

प्रोक्लोनशन शिक्का याचा अर्थ काय?
दर १० वर्षाने सातबारा नवीन लिहला जातो त्याची कार्यपद्धती शास्नानाने जमीन महसूल कायद्यामध्ये ठरवलेली आहे. ती पुढीलप्रमाणे.
१) सातबारा हा १०० % तलाठ्याने लिहायचा
२) मग पुन्हा १०० % सर्कल ने तपासायचा
३) त्यातले ५% सातबारे रॅन्डमली तहसीलदाराने प्रत्यक्ष येऊन तपासायचे असतात.
आणि मग झालेल्या सर्व नोंदी बरोबर आहेत कि नाही हे गावा समोर वाचन केले जाते. आणि हे केल्या नंतर जाहीरनामा काढतात. त्यादवरे सर्व गावकर्यांना सांगितले जाते आता या गावचा जुना सातबारा बंद झाला आहे आणि नवा सातबारा आता अस्तित्वात आला आहे याला आपण प्रोक्लोनशन असे म्हणतो किंवा जाहीरनामा असे म्हणतो. प्रोक्लोनशन चा अर्थ शेतकऱ्याने आसा घ्यायला पाहिजे अद्याप हा सातबारा तहसीलदाराने अंतिम केलेला नाही म्हणजे यांच्यात जर चूक असेल तर ती ताबडतोब लक्षात आणून द्यायला हवी. व त्यामध्ये योग्य ते बदल करून घेतले पाहिजे.

ऑनलाईन सातबारा व ८ अ उतारा बघण्यासाठी - https://bhumiabhilekh.maharashtra.gov...

#Satbara #Utara #land #agricultural_land #farmer #agriculture #शेती #शेतकरी #सातबारा_उतारा #revenue_department #talathi #landrecords

Follow me on:-
facebook :   / umeshmahadik57  
Instagram :   / umeshmahadik7  
Amazon : https://www.amazon.in/shop/umeshmahadik
YouTube :    / umeshmahadik  
Blogger : https://umeshmahadik.blogspot.com
Twitter :   / mahadik14  

If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE, COMMENT.

Комментарии

Информация по комментариям в разработке