Shri Dhootpapeshwar Mandir | Dhopeshwar | Rajapur | Ratnagiri | Kailasa - The Infinite | Episode 6

Описание к видео Shri Dhootpapeshwar Mandir | Dhopeshwar | Rajapur | Ratnagiri | Kailasa - The Infinite | Episode 6

PAULKHUNA, THE FOOTPRINTS

SHRI DHOOTPAPESHWAR MANDIR | EPISODE 6 | DHOPESHWAR | RAJAPUR | RATNAGIRI | KAILASA - the infinite

धूतपापेश्वर मंदिर हे धोपेश्वर गावातील जागृत स्वयंभू देवस्थान आहे. महादेवाचा अवतार असून सर्व पापांना धुऊन काढणारा देव आहे, म्हणून धूतपापेश्वर हे नाव पडले. राजापूरात निळोबा भट नावाचे एक गृहस्थ राहत होते. परिस्थितीने गरीब असूनही जे काही मिळेल त्यात ते समाधानी होते. काशीविश्वेवर दर्शन आणि गंगास्नान करण्यास हे काशीला जात असत. पण नंतर वयोमानामुळे काशीला जाणे शक्य नव्हते. ते शिवभक्त होते त्यामुळे त्यांना शिव दर्शनाची ओढा लागली होती आणि त्यात त्यांच्या घरी असलेल्या गाईने अचानक दूध देण्याचे बंद केले. म्हणून त्यांनी गुराख्याला गाईवर पाळत ठेवयाला सांगितले. एकदा गुराख्याने रानात गाईला झाडाखाली पान्हा सोडताना पहिले, हे पाहून रागावलेल्या गुराख्याने त्या झाडाखालच्या खडकावर कुऱ्हाडीचा घाव घातला. त्याबरोबर त्या खडकाचा एक लहान तुकडा उडून कासर्डे गावी पडला आणि त्याचे 'कपालेश्वर' लिंग झाले. गुराख्याने हि घटना निळोबा भटांना सांगितली. निळोबा भटांना त्या खडकात तुटलेले शिवलिंग दिसले. त्यांना ते पाहून खूप वाईट वाटले. आजही ते स्वयंभू शिवलिंग तुटलेली आहे. तुटलेले खडक पाहून गाईने बाजूच्या डोहात उडी घेतली (कोटीतीर्थात) आणि गाई पाठोपाठ निळोबा भटांनीही प्रायश्चित म्हणून कोटी तीर्थात देहविसर्जन केले. अशी ही भावपूर्ण कथा आहे.

या मंदिराचा लाकडी सभामंडप असून त्याचे छत कौलारू आहे. सभा मंडपाच्या छताला आकर्षक रंगीत पताक्यांची सजावट आहे आणि नक्षीकाम असलेले खांब आहेत. त्यावरील मारुती, कमळ, मासे, मोरपीस असे लाकडातील कोरीवकाम हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. सभोवतालचा परिसर अतिशय निसर्गरम्य असून मंदिर प्राचीन आहे. मोठा सभामंडप, अंतर्ग्रह, गर्भगृह आहे. मंदिरात येताचक्षणी मन शांत आणि प्रसन्न होते. प्रवेशद्वारावर नगारखाना व आवारात दीपमाळा आहेत. सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते.

Do Like, Share with Everyone and Subscribe Paulkhuna to Watch New Episode respectively. Press the Bell icon to be Updated with us & Let us know Your Views on the Video in comments section.

Google Map Location
Shree Dhootapapeshwar Mandir - https://www.google.co.in/maps/place/D...

DESCRIPTION BY: Aniket Bankar✍

#धूतपापेश्वरमंदिर #rajapur #ratnagiri #lordshiva #mahashivratri2022

FOLLOW US ON SOCIAL MEDIA:
FACEBOOK:   / paulkhunathefootprints  
YOUTUBE: https://www.youtube.com/Paulkhunathef...
INSTAGRAM:   / wizwings.paulkhuna  

Комментарии

Информация по комментариям в разработке