micronutrient fertilizer | सूक्ष्म अन्नद्रव्ये खते

Описание к видео micronutrient fertilizer | सूक्ष्म अन्नद्रव्ये खते

▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!

👉महाधन कॉम्बी ( मिक्स माइक्रोन्यूट्रिएंट ) - https://krushidukan.bharatagri.com/pr...
👉इंस्टाफर्ट कॉम्बी - मिक्स माइक्रोन्यूट्रिएंट - https://krushidukan.bharatagri.com/pr...

===============================================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱micronutrient fertilizer | सूक्ष्म अन्नद्रव्ये खते👍

पिकाच्या वाढीसाठी आवश्यक १६ अन्नद्रव्यांपैकी १३ जमिनीतून, तर तीन अन्नद्रव्ये पाणी आणि हवेतून मिळतात. या १३ अन्नद्रव्यांपैकी अधिक प्रमाणात लागणारी तीन, मध्यम प्रमाणात लागणारी तीन व कमी प्रमाणात लागणारी सात मूलद्रव्ये आहेत. त्यांना अनुक्रमे प्रमुख, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणतात.

👉प्रमुख अन्नद्रव्ये - ही नत्र (N2), स्फुरद (P2O5) व पालाश (K+)
👉दुय्यम अन्नद्रव्ये - कॅल्शियम (Ca2+), मॅग्नेशियम (Mg2+) व गंधक (SO42)
👉सूक्ष्म अन्नद्रव्ये - लोह (Fe2+), मँगेनीज (Mn2+), कॉपर (Cu2+), झिंक (Zn2+), बोरॉन (H3BO3) मॉलिब्डेनम (MoO42) आणि क्लोरिन (Cl-). चला जाणून घेऊयात सूक्ष अन्नद्रव्यांबाबत.

✅सूक्ष्म अन्नद्रव्ये -

1️⃣लोह (Fe2+)
👉कार्य : हरितद्रव्यांच्या निर्मितीसाठी लोहाची गरज असते. प्रकाशसंश्‍लेषण व श्‍वसनक्रियेत लोहाचा सहभाग असतो. नत्र, स्फुरद व पालाश यांच्या शोषणात लोहाचा अप्रत्यक्ष सहभाग असतो.
👉कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे - शेंड्याकडील पानांच्या शिरामधील भाग पिवळा होतो. झाडांची वाढ खुंटते.
👉उपाय - चिलेटेड लोह १ ग्राम प्रति लिटर पाणी फवारणी करावी किंवा पिकानुसार चिलेटेड लोह २५० - ५०० ग्राम प्रति एकरी ड्रीप मधून द्यावे.

2️⃣मँगेनीज (Mn2+)
👉कार्य : प्रकाश संश्‍लेषण, प्रथिने निर्मिती, संजीवके प्रक्रियेत सहभाग. संप्रेरक म्हणून रासायनिक प्रक्रियेत सहभाग असतो. हरितद्रव्य तयार करण्यात महत्त्वाचे कार्य.
👉कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे - पानांच्या शिरा हिरव्या व शिरामधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो व नंतर पांढरट व करडा होतो, संपूर्ण पान फिकट होवून नंतर पान गळते.
👉उपाय - चिलेटेड मँगेनीज १ ग्राम प्रति लिटर पाणी फवारणी करावी किंवा पिकानुसार चिलेटेड मँगेनीज २५० - ५०० ग्राम प्रति एकरी ड्रीप मधून द्यावे.

3️⃣कॉपर (Cu2+)
👉कार्य : तांबे प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक भूमिका पार पाडत असते.
पिकांच्या फळाची चव, रंग आणि फुलाचा रंग हा योग्य प्रमाणात तांबे असल्यास उत्तम होतो.
👉कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे - झाडांच्या शेंड्याची वाढ खुंटते, झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो. खोडाची वाढ कमी होते, पाने लगेच गळतात.
👉उपाय - चिलेटेड कॉपर १ ग्राम प्रति लिटर पाणी फवारणी करावी किंवा चिलेटेड कॉपर २५० ग्राम प्रति एकरी ड्रीप मधून द्यावे.

4️⃣झिंक (Zn2+)
👉कार्य : पिकाच्या शेंड्याची जोमदार वाढ करण्यास मदत करते. वनस्पतीच्या पाणी शोषण कार्यात जस्ताची मदत होते. पिकाच्या पेशीमधील योग्य प्रमाणामुळे पीक कमी - जास्त तापमानात देखील तग धरुन राहते.
👉कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे - पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा होतो. व पाने ठिकठिकाणी वाळलेले दिसतात.
👉उपाय - चिलेटेड झिंक १ ग्राम प्रति लिटर पाणी फवारणी करावी किंवा पिकानुसार चिलेटेड झिंक २५० - ५०० ग्राम प्रति एकरी ड्रीप मधून द्यावे.

5️⃣बोरॉन (H3BO3
👉कार्य : वनस्पतीतील फुलंनिर्मिती, परागीभवन, फलधारणा, फळांची संख्या, बीजनिर्मिती हे सर्व बोरॉन आणि संप्रेरके यांच्या सहयोगाने घडते.
👉कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे - बोरॉन च्या कमतरतेमुळे फुले, फळे यांचे अकाली गळुन पडतात. बोरॉनची कमतरता असल्यास फळे तडकतात.
👉उपाय: फुले लागताच बोरॉन २०% ५०० ग्राम प्रति एकरी ड्रीप मधून द्यावे. फवारणीसाठी १ ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

6️⃣मॉलिब्डेनम (MoO42)
👉कार्य : नत्र स्थिरीकरण करणाऱ्या सूक्ष्म जिवांची क्रियाशीलता वाढते. द्विदल धान्यामध्ये नत्रीकरणाचा वेग वाढविण्यास हे सूक्ष्मअन्नद्रव्य मदत करते.
👉कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे - पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात. पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी
👉उपाय - सोडियम मॉलिब्डेट २०० ग्राम एकरी जमिनीतून द्यावे. अमोनिअम मॉलिब्डेट १ ग्राम प्रति लिटर पाण्यामधून फवारणी करावी.

✅महत्वाचे - कमतरतेची लक्षणे दिसण्याच्या आधीच पीक लागवड करताना मायक्रोनुट्रीएंट मिक्शर (ग्रेड १) एकरी १० किलो खतासोबत दिल्यास तसेच उभ्यापिकामधे मायक्रोनुट्रीएंट मिक्शर (ग्रेड २) हे १५ ग्राम प्रति १५ लिटर पंप किंवा २५० ग्राम प्रति एकरी ड्रीप मधून दिल्यास कमतरतेची लक्षणे दिसणार नाहीत.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Комментарии

Информация по комментариям в разработке