गवतफुला रे ! गवतफुला ! | इंदिरा संत | इयत्ता सहावी | #माझीशाळा #MajhiShaala
🎯 इथे Subscribe करा : [ / @माझीशाळा-झ3प ]
#कृतीयुक्त
इयत्ता सहावी | विषय - मराठी | कविता | गवतफुला रे ! गवतफुला ! | इंदिरा संत
...
रंगरंगुल्या, सानसानुल्या,गवतफुला रे गवतफुला!
असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा!
मित्रांसंगे माळावरती, पतंग उडवीत फिरताना
तुला पाहिले गवतावरती, झुलता झुलता हसताना,
विसरून गेलो पतंग नभिचा, विसरून गेलो मित्रांला
पाहून तुजला हरखून गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा!
हिरवी नाजुक रेशीम-पाती, दोन बाजूंला सळसळती
नीळनिळूली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती,
तळी पुन्हा अन गोजिरवाणी, लाल पाकळी खुलती रे
उन्हामधे हे रंग पाहता, भान हरपुनी गेले रे!
वारा घेऊन रूप सानुले, खेळ खेळतो झोपाळा
रात्रही इवली होऊन म्हणते,अंगाईचे गीत तुला,
मलाही वाटे लहान होऊन, तुझ्याहूनही लहान रे
तुझ्यासंगती सदा रहावे, विसरुनि शाळा, घर सारे!
तुझी गोजिरी शिकून भाषा, गोष्टी तुजला सांगाव्या
तुझे शिकावे खेळ आणखी, जादू तुजला शिकवाव्या,
आभाळाशी हट्ट करावा,खाऊ खावा तुझ्यासवे
तुझे घालुनी रंगित कपडे,फूलपाखरां फसवावे!
...
🎭 कल्पना - संकल्पना : Surabhi (Sau. Pooja Rajesh Jadhav)
पदवीधर शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा गिरीम, तालुका दौंड, जिल्हा पुणे, केंद्र बेटवाडी
Main Channel : Surabhi [ / @surabhi76 ]
ठिकाण : जिल्हा परिषद शाळा गिरीम, तालुका दौंड, जिल्हा पुणे, केंद्र बेटवाडी
...
#majhishaala #माझीशाळा #कृतीयुक्त #इयत्तासातवी #std6 #std6th #marathi #medium #sixth #standard #zpps #zillaparishadshaala #surabhi #mejadhavr #kids #dance #music #video #outside
🔴Like 👍 Subscribe 🔔 and Share ➡️ with our friends 👬🎉🔴
Информация по комментариям в разработке