शे'ती'सध्या काय करते? - भाग 11 (रानभाज्यांची भटकंती) - (She'ti' Sadhya Kaay Karte? - Part 11)

Описание к видео शे'ती'सध्या काय करते? - भाग 11 (रानभाज्यांची भटकंती) - (She'ti' Sadhya Kaay Karte? - Part 11)

‪@farmofhappinessagrotourism‬   'आनंदाचं शेत कृषी पर्यटन' म्हणजेच 'फार्म ऑफ हॅपिनेस 'ऍग्रो टुरिझमच्या व्हिडिओ उपक्रमातल्या"शे'ती' सध्या काय करते?" च्या या अकराव्या भागात आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत आमच्या शेतात आणि परिसरातल्या रानभाज्या शोधायला. शेती करणं म्हणजे फक्त अन्न किंवा पीक उगवणं इतकंच नसून मुळात अन्न आणि आपलं अन्न उगवणाऱ्या परिसराला समजून घेणंही आहे असं आम्हाला वाटत. ऍग्री 'कल्चर' म्हणजे शेती 'संस्कृती!' आणि संस्कृतीचा अर्थ फक्त पाककृती, सण, पूजा, कार्यक्रम रांगोळ्या, वेष इतकाच नसून खूप खोल आणि विस्तृत आहे. या सगळ्या गोष्टी तर हिमनगाच्या वरच्या टोकासारख्या फक्त सहज दिसणाऱ्या आहेत. पण त्यांचा पाया खूप खोल आणि विस्तारित अशा विज्ञानावर आधारित आहे. अशा विज्ञानावर, जे निसर्ग निष्ठ किंवा मुळातच निसर्गनिर्मित आहे. त्यात निसर्गाला हरवण्याचा, त्याच्यावर कुरघोडी करण्याचा अट्टाहास नाही. ऋतुनिहाय अन्नपद्धतीत केवढा सहजपणा आणि ते किती आरोग्यदायी! हे आम्ही काय सांगणार बापडे? आम्ही तर फक्त जे अनेकांनी अनुभवलंय, सांगितलंय, मांडून ठेवलंय त्याची पुन:प्रचिती घेतोय. आणि त्या अनुभवांत अनेकांना सामील करून घेण्यासाठी कृषीपर्यटन राबवतोय. कारण 'कृषी' हा आज व्यवसाय झालेला असला तरी मुळात ती कृती फक्त 'अन्न निर्मितीचीच'! आजची ही रानभाज्यांसाठीची भटकंतीही त्याचाच भाग! आमचं म्हणणं पूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला या आमच्या प्रयत्नांबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आणि शुभेच्छा आमच्या पर्यंत पोहोचवायला विसरु नका बरं!

Комментарии

Информация по комментариям в разработке