Laxman Hake | Pune | मला जीवे मारण्याचा प्रयत्न - लक्षमण हाके यांचा आरोप

Описание к видео Laxman Hake | Pune | मला जीवे मारण्याचा प्रयत्न - लक्षमण हाके यांचा आरोप

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात पुण्यात वाद झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आले असता हा वाद झाला. लक्ष्मण हाके यांनी दारु प्यायली असल्याचा मराठा आंदोलकांनी दावा केला. लक्ष्मण हाके हे पुण्यातील खुल्या पटांगणावर दारू प्यायला बसले होते, तेव्हा त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. या प्रकरणी लक्ष्मण हाकेंची मेडिकल चाचणी करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली
यासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी दिसतात. त्यामध्ये लक्ष्मण हाके यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी धरल्याचं दिसून येतंय. या वादानंतर दोन्ही बाजूचे लोक कोंढवा पोलिस ठाण्यात पोहचले असून एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करणे सुरु आहे. लक्ष्मण हाके यांची मेडिकल टेस्ट करण्याची मराठा आंदोलकांनी मागणी केली आहे. तर मराठा आंदोलकांनी आपल्यावर जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.

लक्ष्मण हाकेंनी दारू प्यायल्याचा दावा

एका मराठा आंदोलकाने सांगितलं की, लक्ष्मण हाके हे खुल्या पटांगणामध्ये दारू प्यायला बसले होते. त्यावेळी त्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनी मराठा आंदोलकांसोबत वाद घातला. त्यावेळी लक्ष्मण हाके यांना साधं उभारताही येत नव्हतं. त्यावेळी लक्ष्मण हाके यांनी मराठा बांधवांना शिवीगाळ केल्याचा आरोपही त्या आंदोलकाने केला.
#news #marathinews #latestnews #gauri #gauriakkistudio #gaurigopalashram #hindinews #yashomatithakur #bjp #rahulgandhi #marathareservation #maratha #once #obcreservation #obcsamaj #obcvsmaratha #marathaaarakshan ‪@LaxmanHake‬ ‪@ManojJarange‬ ‪@manojarangepatil30‬ ‪@mieknathshinde5887‬ ‪@Dr.ShrikantEknathShinde‬ ‪@DevendraFadnavis‬ ‪@AmitShah‬

Комментарии

Информация по комментариям в разработке